SET परीक्षेचा निकाल एसईबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतरच ; सेट विभागाचे जाहीर प्रकटन 

निकाल कसा जाहीर करावा यावर शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाले नाही.त्यामुळे सेट विभागाने प्रकटन प्रसिद्ध केले आहे.एज्यूवार्ताने याबाबतचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध केले होते. 

SET परीक्षेचा निकाल एसईबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतरच ; सेट विभागाचे जाहीर प्रकटन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

"सेट परीक्षेसाठी (set exam) एसईबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षण (Reservation for SEBC category students)लागू करावे किंवा कसे" याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून याबाबत विद्यापीठाकडून राज्य शासनाकडे पाठपुरावा (Follow up with State Govt)सुरू आहे. राज्य शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त होताच ७ एप्रिल, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर (Set exam result announced)करण्यात येईल,असे जाहीर प्रकटन (public disclosure) विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे (Set department) प्रसिध्द करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र व गोवा राज्यातील प्रमुख 17 शहरांमधील 298 परीक्षा केंद्रांवर सेट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी यंदा 1 लाख 28 हजार 243 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यातील 1 लाख 9 हजार 154 विद्यार्थी परीक्षेस उपस्थिती होते.हे सर्व विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.मात्र, निकाल कसा जाहीर करावा यावर शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाले नाही.त्यामुळे सेट विभागाने प्रकटन प्रसिद्ध केले आहे.एज्यूवार्ताने याबाबतचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध केले होते. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरीष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरीता प्राधिकृत विभाग आहे. ७ एप्रिल, २०२४ रोजी ३९ व्या सेट परीक्षेचे आयोजन सेट विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरीता १७ शहरांमधील विविध महाविद्यालयात करण्यात आले होते. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्याचे काम सेट परीक्षा विभागाकडून पुर्णत्वास आले आहे. मात्र, परीक्षेचा निकाल जाहीर करताना एसईबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे ? याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे, असे सेट विभागाने प्रसिध्द केलेल्या जाहीर प्रकटन नमूद करण्यात आले आहे.