पोलीस भरती वयोमर्यादा वाढीसाठी आझाद मैदानावर ठिय्या

सरकारच्या दिरंगाईमुळे भरती प्रक्रिया 2024 मध्ये सुरू झाली. ज्यामुळे 2 लाख विद्यार्थी भरती प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे दोन वर्ष वयमर्यादा वाढवून भरती प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी या उमेदवारांना एक संधी देणे आवश्यक आहे.  

पोलीस भरती वयोमर्यादा  वाढीसाठी आझाद मैदानावर ठिय्या

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील पोलीस भरतीची (Police Recruitment) तयारी करणाऱ्या तरुणाना  (Youth preparing for police recruitment) वय वाढ मिळावी (Demand to be increased in age) या मागणीसाठी मुंबई शहरातील आझाद मैदानावर आंदोनल सुरू आहे. या आंदोलनाला शिवसेना (उबाठा) पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. तसेच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Mayor Kishori Pednekar and leader Sushma Andhare) या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. 

सुषमा अंधारे म्हणाल्या, 2022-23 मध्ये निघालेल्या पोलीस भरतीला शासन निर्णयानुसार डिसेंबर 2023 पर्यंतची वयोमर्यादा पात्र असायला हवी. मात्र सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे भरती प्रक्रिया 2024 मध्ये सुरू झाली. ज्यामुळे 2 लाख विद्यार्थी भरती प्रक्रियेपासून बाहेर पडले आहेत. त्यामुळे दोन वर्ष वयोमर्यादा वाढवून भरती प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी या उमेदवारांना एक संधी देणे आवश्यक आहे.  

छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान सारख्या इतर राज्यांमध्ये वयोमर्यादा वाढ मिळू शकते, एवढेच नाही तर केंद्र सरकाने देखील वयोमर्यादा वाढवली आहे.सगळ्यात महत्वाचा मुद्दा आम्ही वय वाढ मागत नाही तर केवळ एक संधी मागत आहोत, ती आम्हाला का मिळू नये? याचे कारण त्यांनी आम्हाला द्यावे. आमची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे. महत्ताचा मुद्दा हा आहे की, ३१ डिसेंबरच्या आधी भरती झाली असती तर आमच्यावर ही वेळच आली नसती, असे आंदोलक उमेदवारांचे म्हणणे आहे.