कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये होणार सुसज्ज ; केंद्र सरकारचा निर्णय

देशभरातील सर्व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये आता माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान लॅब आणि स्मार्ट क्लास रूमने सुसज्ज असतील.

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये होणार सुसज्ज ; केंद्र सरकारचा निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुलींच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी (To promote the empowerment of girls) केंद्र सरकारने (Central Govt) आणखी एक मोठा निर्णय (Big decision) घेतला आहे. या अंतर्गत, देशभरातील सर्व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये (KGBVs) आता माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) लॅब आणि स्मार्ट क्लास रूम (smart class room) ने सुसज्ज होणार आहे. यासाठी एकूण 290 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या शाळांमध्ये शिकणाऱ्या सात लाख मुलींना या उपक्रमाचा फायदा (Benefit of the initiative) होणार आहे. सध्या देशात सुमारे 5 हजार 116 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये कार्यरत आहेत.

शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमामुळे विद्यार्थिनी डिजिटल पद्धतीने सुशिक्षित होतील आणि त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये वाढेल.  यामुळे डिजीटल ज्ञानातील स्त्री-पुरुषांमधील सध्याची दरी कमी करणे देखील शक्य होणार आहे. या शाळा सहावी ते बारावीपर्यंतच्या निवासी शाळा आहेत. ज्यामध्ये वंचित वर्गातील मुलींना जसे की SC, ST, OBC, अल्पसंख्याक आणि दारिद्र्यरेषेखालील (BPL) शिक्षण दिले जाते. या शाळा दुर्गम भागात सुरू करण्यात आल्या आहेत.

केजीबीव्हीमध्ये आयसीटी सुविधा उपलब्ध झाली तर येथे शिकणाऱ्या विद्यार्थिनींना शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध डिजिटल प्लॅटफॉर्मचा लाभ मिळणार आहे. जसे की, त्यांना नॅशनल डिजिटल लायब्ररी, ई-पाठशाळा, नॅशनल ओपन एज्युकेशनल रिसोर्स रिपॉझिटरी आणि दीक्षा इत्यादींमध्ये प्रवेश मिळेल. त्यामुळे या मुलींचे ज्ञान आणि कौशल्यही वाढण्यास मदत होणार आहे.