NEET PG परीक्षांच्या तारखा जाहीर? एनबीईने दिले स्पष्टीकरण

दरम्यान NEET PG परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या जोरदार व्हायरल होत आहेत.

NEET PG परीक्षांच्या तारखा जाहीर? एनबीईने दिले स्पष्टीकरण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NEET PG परीक्षा पुढे ढकलल्यापासून उमेदवार नवीन तारखा जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE)  देखील या संदर्भात अदयावत माहिती प्रसिद्ध करत आहे. परंतु, परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. दरम्यान NEET PG परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, अशा स्वरूपाच्या फेक बातम्या जोरदार व्हायरल होत आहेत. यावर NEB ने विद्यार्थी आणि पालकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

या फेक न्यूजमध्ये राष्ट्रीय परीक्षा मंडळाचे नावही वापरले जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चुकीच्या आणि बनावट नोटीस जारी केल्या जात आहेत, ज्यामध्ये परीक्षेची तारीख जाहीर झाल्याची बातमी दिली जात आहे. परंतु, अशा कोणत्याही खोट्या बातम्यांना बळी पडू नका, असे एनबीईकडून सांगण्यात आले आहे.

या संदर्भात जारी केलेल्या नोटीसमध्ये NBE ने लिहिले आहे की, "आमच्या निदर्शनास आले आहे की, काही खोट्या नोटीस, ईमेल, एसएमएस आणि इतर सामग्री सोशल मीडियावर प्रकाशित होत आहेत. ज्यामध्ये NBEMS चे नाव वापरले जात आहे. या बनावट नोटिसांमध्ये NEET PG 2024 च्या नवीन सुधारित वेळापत्रकाची माहिती दिली जात आहे, जी पूर्णपणे चुकीची आहे. नॅशनल बोर्डाने असेही म्हटले आहे की, जुलै 2020 पासून, NBE ने जारी केलेल्या प्रत्येक नोटिसमध्ये QR कोड आहे. हा QR कोड स्कॅन केल्यावर उमेदवाराची थेट दखल घेतली जाते.

NBEMS कधीही कोणत्याही उमेदवाराला चांगले गुण मिळवण्याबद्दल माहिती देणारे ईमेल किंवा एसएमएस पाठवत नाहीत. ईमेल-एसएमएस, मेसेज इत्यादी किंवा सोशल मीडियाद्वारे कोणतीही माहिती मिळाल्यास सावध रहा. कृपया NBEMS च्या नावाने तुम्हाला मिळत असलेली माहिती पुन्हा तपासा असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, ३ जुलै रोजी गृह मंत्रालय, NBE, सायबर सेल, तांत्रिक भागीदार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यात बैठक पार पडली त्यात परीक्षा या गृहमंत्रालयाच्या देखरेखीखाली घेण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे.