SSC Result : दहावीच्या निकालात पुन्हा लातूर पॅटर्न; १०९ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीचा निकाल जाहीर केला. राज्याचा एकूण निकाल ९३.८३ टक्के इतका लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांनी घट झाली आहे.

SSC Result : दहावीच्या निकालात पुन्हा लातूर पॅटर्न; १०९ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
SSC Result Update

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता दहावीच्या निकालात (SSC Result News) यंदा पुन्हा लातूर पॅटर्न (Latur Pattern) आढळून आला आहे. एकूण निकालात लातूर विभाग सातव्या क्रमांकावर असला तरी शंभर टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये या विभागाने बाजी मारली आहे. विभागातील १०९ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. राज्याचा हा आकडा १५१ एवढा आहे. (Maharashtra SSC Board Result)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (SSC Board) अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी दहावीचा निकाल (10th Result) जाहीर केला. राज्याचा एकूण निकाल ९३.८३ टक्के इतका लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांनी घट झाली आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यानंतर अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. पण त्यापुर्वी गोसावी यांनी परीक्षेत शंभर टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली.

SSC Result Update : इयत्ता दहावीचा निकाल जाहीर; निकालात तीन टक्क्यांची घसरण, पाहा आणखी ठळक वैशिष्ट्ये...

दहावीचा निकाल बेस्ट ऑफ फाईव्ह तत्वानुसार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या पाच विषयांचे गुण गृहित धरून निकाल जाहीर केला जातो. निकालामध्ये १५१ विद्यार्थ्यांना पाच विषयांत शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहेत. त्यामुळे बेस्ट ऑफ फाईव्हनुसार त्यांना शंभर टक्के इतके गुण मिळाले आहेत. मागील वर्षी १२२ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले होते.

सर्वाधिक शंभर टक्के गुण मिळालेले १०९ विद्यार्थी एकट्या लातूर विभागातील आहेत. मागील वर्षीही लातूर विभागातील सर्वाधिक ७० विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण होते. त्यापाठोपाठ २२ विद्यार्थी औरंगाबाद विभागातील तर सात विद्यार्थी अमरावती विभागातील आहेत. यामध्ये मुंबईतील सहा, पुण्यात पाच आणि कोकणातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नागपूर, कोल्हापूर आणि नाशिक विभागातील एकाही विद्यार्थ्याला शंभर टक्के गुण मिळालेले नाहीत.

शंभर टक्के गुण मिळालेले विद्यार्थी (विभागनिहाय) -

पुणे – ५

नागपूर – ००

औरंगाबाद – २२

मुंबई – ६

कोल्हापूर – ००

अमरावती – ७

नाशिक – ००

लातूर – १०८

कोकण – ३

एकूण - १५१

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo