अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

माध्यमिक विभागाच्या वतीने विद्यार्थी आपापल्या परिसराची स्वच्छता करून आम्हीही स्वच्छतेसंबंधी नेहमीच जागरूक असू, असे माध्यमिक विभागाचे विद्यार्थी म्हणाले.

अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ
Abhinav School

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

आंबेगाव संकुलातील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या (Abhinav Education Society) इंग्रजी माध्यम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने महात्मा गांधी (Mahatma Gandhi) जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

 

माध्यमिक विभागाच्या वतीने विद्यार्थी आपापल्या परिसराची स्वच्छता करून आम्हीही स्वच्छतेसंबंधी नेहमीच जागरूक असू, असे माध्यमिक विभागाचे विद्यार्थी म्हणाले. त्याचबरोबर प्रत्येकाने स्वच्छता फक्त २ ऑक्टोबर या दिवशीच न करता, दररोज वेळ काढला पाहिजे आणि त्याची सुरुवात आम्ही स्वतःपासून करणार आहोत, असे एन.एस. एस.चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी म्हणाले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथही घेतली.

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात 'स्वच्छताही सेवा' उपक्रम

 

या अभियानासाठी संस्थेचे संस्थापक राजीव जगताप, सचिव सुनीता जगताप, सहसचिव निर्मोही जगताप, अॅड. दिलीप जगताप, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे, पर्यवेक्षिका सुनीता यादव, धनश्री खरे, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक नितीन डावरे, महानगरपालिकेचे स्वच्छतेचे सर्व कर्मचारी, स्काऊट गाईडचे विद्यार्थी, सर्व शिक्षक उपस्थित होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j