Jewellery Designing : विद्यार्थ्यांना मिळणार ‘पीएनजी’ची साथ, ‘डीईएस’सोबत करार

विदयार्थ्यांनी केलेली डिझाईन्स प्रत्यक्ष दागिन्यांच्या स्वरुपात पीएनजी तयार करणार आहेत. कारागीराला डिझाइन समजावून देण्यापासून ते दागिना प्रत्यक्ष पूर्ण होईपर्यंतचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

Jewellery Designing : विद्यार्थ्यांना मिळणार ‘पीएनजी’ची साथ, ‘डीईएस’सोबत करार
Jewellery Designing Course

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मागील काही वर्षांपासून ज्वेलरी डिझाइनिंगमध्ये (Jewellery Designing) कुशल मनुष्यबळाची मागणी सातत्याने वाढत आहे. पण त्याप्रमाणात विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव पुरेसा मिळत नाही.  यापार्श्वभूमीवर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (Deccan Education Society) 'जगन्नाथ राठी इन्स्टिट्यूट आणि पीएनजी अन्ड सन्स (PNG and Sons) ज्वेलर्समध्ये करार करण्यात आला आहे. विदयार्थ्यांनी केलेली डिझाईन्स प्रत्यक्ष दागिन्यांच्या स्वरुपात पीएनजी तयार करणार आहेत. कारागीराला डिझाइन समजावून देण्यापासून ते दागिना प्रत्यक्ष पूर्ण होईपर्यंतचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

जगन्नाथ राठी इन्स्टिट्यूटने येत्या शैक्षणिक वर्षापासून ज्वेलरी डिझाइनिंगमध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अधिपत्याखाली सुरु केला आहे. दोन वर्षाचा अवधी मिळाल्याने अभ्यासक्रमातील सर्व मुद्दे सविस्तर शिकवता येतील तसेच प्रात्यक्षिके पूर्ण करण्यासाठी विदयार्थ्यांना पुरेसा वेळ मिळेल. यावर्षी पासून दुसऱ्या वर्षाच्या विदयार्थ्यांकरिता Computer Aided Designing अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे.

NExT 2023 : आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय, परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित

फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा. स्वाती जोगळेकर, इन्स्टिट्यूटचे संचालक प्रशांत गोखले, पीएनजीचे मार्केटिंग चीफ आदित्य मोडक, समन्वयक ओमकार भिडे आणि ज्वेलरी विभागाचे प्रमुख विनायक भिडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

प्रशिक्षणादरम्यान विदयार्थ्यांच्या डिझाइन्स बरोबर प्रत्यक्ष तयार झालेले दागिने कॉलेजच्या प्रदर्शनात मांडले जाणार आहेत. त्याच प्रमाणे विदयार्थ्यांची डिझाइन्स आणि दागिने हे P. N.G. and Sons च्या शोरूम मध्ये ही प्रदर्शित केले जाणार आहेत. अशा तऱ्हेने कागदावरील व्दिमितीमध्ये असलेले डिझाइन ते त्रिमिती मध्ये तयार झालेला दागिना असा सृजनात्मक प्रवास विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभवणार आहेत.

यंदापासून Artifacts Designing हयाचे प्रशिक्षण हा अत्यंत वेगळा असा या कोर्सचा शेवटचा महत्त्वाचा भाग असेल. हा कोर्स पूर्ण केल्यावर विद्यार्थी व्यावसायिक डिझायनर म्हणून इंडस्ट्रीमधे कुठेही आत्मविश्वासाने काम करू शकेल अशा तऱ्हेने हा अभ्यासक्रम नियोजीत करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD