अण्णासाहेब मगर महाविद्यालयात 'स्वच्छताही सेवा' उपक्रम
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन झाले. या प्रसंगी त्यांनी स्वच्छतेचे महत्व स्पष्ट केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
अण्णासाहेब मगर महाविद्यालयात (Annasaheb Magar College) 'स्वच्छताही सेवा' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) जयंती निमित्ताने संपूर्ण भारतभर एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान या अंतर्गत महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन झाले. या प्रसंगी त्यांनी स्वच्छतेचे महत्व स्पष्ट केले. तसेच आपल्या परिसरात स्वच्छता राखण्याचा संकल्प करून विद्यार्थ्यांना स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात श्रमदानातून स्वच्छता
राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि विद्यार्थी विकास मंडळ या विभागाचे ३०० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. सविता कुलकर्णी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. गणेश गांधिले, प्रा. नितीन लगड, प्रा. गौरव शेलार, प्रा. अंजु मुंडे, डॉ. गणपत आवटे, प्रा. अनिता गाडेकर आदी उपस्थित होते.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
eduvarta@gmail.com