प्रबोधनपर, वैचारिक मंथनातून महात्मा फुले, आंबेडकरांना अभिवादन

दि. ११ ते १४ एप्रिल या चार दिवसांच्या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बक्षीस वितरण माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते पार पडले.

प्रबोधनपर, वैचारिक मंथनातून महात्मा फुले, आंबेडकरांना अभिवादन
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महात्मा फुले (Mahatma Phule) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची संयुक्त जंयती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) उत्साहात साजरी करण्यात आली. दि. ११ ते १४ एप्रिल या चार दिवसांच्या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 

महोत्सवाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे (Karbhari Kale) यांनी केले. महोत्सवात तीन दिवस व्याख्यानमाला, एक दिवस ' मी सावित्रीबाई फुले बोलतेय..' हा एकपात्री प्रयोग, दुसऱ्या दिवशी ' शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाचा प्रयोग तसेच तिसऱ्या दिवशी ' विद्यार्थी जलसा' संपन्न झाला. दि. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सकाळी विद्यापीठात संविधान प्रास्ताविकेची मिरवणूक काढण्यात आली.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाच्या माध्यमातून उत्तम सादरीकरण केले. चार दिवसीय महोत्सवात  वैचारिक,  प्रबोधनभर तसेच मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच इतर कर्मचारी वर्गाचा सहभाग होता. कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी व्याख्यानमालेचा समारोप केला. तर बक्षीस वितरण माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते पार पडले.