SPPU : ललित कला केंद्राची प्रवेश प्रक्रिया सुरू, या तारखेआधी भरा अर्ज

पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी १२ वी किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ६० टक्के गुण आवश्यक आहेत.

SPPU : ललित कला केंद्राची प्रवेश प्रक्रिया सुरू, या तारखेआधी भरा अर्ज
SPPU Lalit Kala Kendra

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) च्या ललित कला केंद्राच्या (Lalit Kala Kendra) प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. वेळापत्रकानुसार पदवी अभ्यासक्रमासाठी नियमित शुल्कासह १० जूनपर्यंत तर विलंब शुल्कासह  १७ जून पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी १७ जूनपर्यंत नियमित शुल्कासह तर ८ जुलै ही विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. पदविका, पदव्युत्तर पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठीही प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. (Savitribai Phule Pune University Admission)

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी २०२३-२४ शैक्षणिक सत्रासाठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये  प्रवेशाची अंतिम तारीख ३० जून आहे. या अभ्यासक्रमांमध्ये गुणवत्ता आणि प्रवेश परीक्षेच्या आधारावर प्रवेश दिला जातो. पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी १२ वी किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ६० टक्के गुण आवश्यक आहेत.

दहावी-बारावीनंतरच्या तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक; प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होणार

इच्छुक उमेदवारांनी https://campus.unipune.ac.in/ या विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज भरायचे आहेत. SPPU ललित कला केंद्रात एम.ए. (५ वर्ष एकात्मिक) संगीत/नृत्य/नाट्य १२ वी नंतर (मराठीत),  MA (५ वर्ष एकात्मिक) संगीत/नृत्य/थिएटर १२ वी नंतर (इंग्रजीमध्ये),  MABY (१+२ वर्ष नियमित) संगीत/नृत्य/थिएटर कोणत्याही पदवीनंतर (मराठीत),  MABY (१+२ वर्षे नियमित) कोणत्याही पदवीनंतर संगीत/नृत्य/थिएटर (इंग्रजीमध्ये), MA (संगीत) ५ वर्ष १२ वी नंतर एकत्रित (मराठीत) हे अभ्यासक्रम घेतले जातात. 

पेपरफुटीमुळे पोलीस भरतीची फेरपरीक्षा घ्यावी का? समन्वय समितीने स्पष्ट केली भूमिका

त्याचप्रमाणे MA (संगीत) ५ वर्ष १२ वी नंतर एकत्रित (इंग्रजीमध्ये),  MA (नृत्य) ५ वर्ष १२ वी नंतर एकत्रित,  MA (नृत्य) ५ वर्ष १२ वी नंतर एकत्रित,  एमए (थिएटर) १२ वी नंतर ५ वर्ष एकत्रित,  MABY (संगीत) १+२ वर्ष कोणत्याही पदवीनंतर नियमित (मराठीत),  MABY (संगीत) १+२ वर्ष कोणत्याही पदवीनंतर नियमित (इंग्रजीमध्ये),  MABY (नृत्य) १+२ वर्ष कोणत्याही पदवीनंतर नियमित, MABY (थिएटर) १+२ वर्ष कोणत्याही पदवीनंतर नियमित आदी अभ्यासक्रमही घेतले जातात.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo