SBI Recruitment : लिपिक/कनिष्ठ सहयोगी मुख्य परीक्षा भरती परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध

ज्या उमेदवारांची परीक्षा सार्वत्रिक निवडणुकांमुळे फेब्रुवारी/मार्च 2024 मध्ये घेण्यात आली नाही अशा उमेदवारांसाठी SBI लिपिक मुख्य परीक्षा 9 जून 2024 रोजी घेतली जाईल.

SBI Recruitment :  लिपिक/कनिष्ठ सहयोगी मुख्य परीक्षा भरती परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 28 मे 2024 रोजी मुख्य परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध केले आहे. ज्या उमेदवारांची परीक्षा सार्वत्रिक निवडणुकांमुळे फेब्रुवारी/मार्च 2024 मध्ये घेण्यात आली नाही, अशा उमेदवारांची SBI लिपिक मुख्य परीक्षा 9 जून 2024 रोजी (Main Exam on 9th June 2024) घेतली जाईल. SBI Clerk Mains परीक्षेसाठी sbi.co.in या वेबसाईटवरून हॉल तिकीट (SBI Clerk Mains Admit Card 2024) डाउनलोड करता येतील.

SBI ने लिपिक पदासाठी मेगा भरती जाहीर केलेली आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर SBI लिपिक पदासाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी ऑनलाइन संगणक आधारित परीक्षा आयोजित केली आहे. या अंतर्गत SBIClerk Bharti 2023 साठी SBI Clerk Prelims, Mains आणि Language Test चे आयोजन करण्यात आले आहे. 

असे डाउनलोड कर SBI Clerk Mains Admit Card

प्रथम अधिकृत संकेतस्थळ sbi.co.in ला भेट द्या. तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. SBI Clerk Admit Card 2024 डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

त्यामुळे SBI लिपिक प्रिलिम्स परीक्षेत बसलेले उमेदवार त्यांचा निकाल तपासण्यासाठी SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर भेट देऊ शकतात आणि यशस्वी घोषित झाल्यास मुख्य परीक्षेत बसण्यासाठी हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. यानंतर करिअर विभागात जा आणि त्यानंतर तुम्ही ज्युनियर असोसिएट्स विभागात दिलेल्या लिंकवरून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून निकालाच्या पानावर जाऊ शकता. उमेदवारांना या पृष्ठावर त्यांचा रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख तपशील सादर करावा लागेल. यानंतर उमेदवार स्क्रीनवर त्यांचा निकाल पाहू शकतील आणि येथे दिलेल्या लिंकवरून त्यांचे हॉल तिकीट (SBI Clerk Mains Admit Card 2024) डाउनलोड करू शकतील.