आईचे मंगळसूत्र विकून परीक्षा देणारा बाहेर राहतो ; पण पेपर फोडणारा तलाठी होतो 

वन भरातीमध्ये ज्याला 54 गुण मिळाले त्याला तलाठी भरतीत 214 गुण मिळाले आहेत.त्यावरही काहींनी आक्षेप घेतला आहे.

आईचे मंगळसूत्र विकून परीक्षा देणारा बाहेर राहतो ; पण पेपर फोडणारा तलाठी होतो 

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

Talathi recruitment : तलाठी भरती दरम्यान पेपर फुटीच्या घटना समोर आल्या असून या प्रकरणात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात या पूर्वी पेपर फूटीच्या प्रकरणात असणा-या आरोपींची नावे समोर येत आहेत. तसेच टीसीएस कंपनीच्या कर्मचार्याचे नातेवाईक तलाठी भरतीत पात्र ठरत आहेत.त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच आईचे मंगळसूत्र विकून तलाठी भरतीची परीक्षा दिली त्यांचे नाव तलाठी भरतीत नाही; पण पेपर फोडणाऱ्यांचे आले आहे,याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

रोहित पवार म्हणाले, तलाठी भरातीमध्ये  10 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी अर्ज केले. काही विद्यार्थ्यांना मुद्दाम 700 किलोमीटर पेक्षा जास्त लांबचे परीक्षा केंद्र देण्यात आले.त्यानंतर केवळ 8 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. खर्च वाढणार असल्याने अडीच लाख विद्यार्थी त्यातून बाहेर पडले.तसेच सर्व परीक्षा या टीसीएसच्या परीक्षा केंद्रात घेणे अपेक्षित होते.पण काही खोल्यांमध्ये , काही बंगल्यामध्ये या परीक्षा घेण्यात आल्या.ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा किंवा मेटल डिटेक्टर नव्हते,अशा ठिकाणी परीक्षा घेतल्या गेल्या.त्यामुळे या ठिकाणी गैरप्रकार घडले,अशी माहिती विद्यार्थ्यांकडून प्राप्त झाली आहे. 

हेही वाचा : विद्यार्थ्यांच्या पीएचडी प्रवेशावर यूजीसीच्या नियमावलीमुळे संक्रांत; नियमावलीत बदल करण्यास युजीसीचा नकार

विद्यार्थ्यांकडून परीक्षेसाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जाते.कारण त्यांच्या परीक्षा या सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली घेतल्या जाणार होत्या,असे सांगितले जात होते.पण अनेक ठिकाणी सीसीटीव्ही उपलब्ध करून दिले नाही.तसेच सीसीटीव्ही असताना पुरावे मात्र तरूणांकडून मागितले जात आहेत, असे नमूद करून रोहित पवार म्हणाले,नाशिक, छत्रपती सांभाजीनगर श्रीगोंदा आदी ठिकाणी पेपर फूटीच्या घटना घडल्या. त्या ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.त्याचप्रमाणे पेपर फोडणाऱ्यामध्ये 200 पैकी 201 गुण मिळाले असल्याचे आढळून आले आहे.पोलीस विभाग काम करणाऱ्याने पेपर फोडले आहेत.2019 च्या पोलीस भरतीत पेपर फोडला तो पोलीस झाला.आता तो व त्यांची बायको तलाठी झाली आहे. 

वन भरातीमध्ये ज्याला 54 गुण मिळाले त्याला तलाठी भरतीत 214 गुण मिळाले आहेत.त्यावरही काहींनी आक्षेप घेतला आहे.तसेच पेपर फूटी प्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचा अभ्यास राज्य शासनाने करावा.त्याचाप्रमाणे टीसीएस कंपनीतील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक तलाठी झाले आहेत.मास कॉपी झाली आहे.तुम्हाला आमच्यावर कारवाई करायची असेल तर निश्चित करा, पण गरीब मुलांच्या भवितव्याचा विचार केला पाहिजे.त्यासाठी राज्य शासनाने खोलात जायला पाहिजे.त्याचप्रमाणे पेपर फूटी प्रकरणी कायदा झाला पाहिजे,अशी मागणी रोहित पवार यांनी केले.