SSC CGL 2024 : 17 हजारांपेक्षा अधिक जागांसाठी मागवले अर्ज

आयोगाने यासंदर्भातील अधिसूचना  ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. ग्रॅज्युएशन पदवी पुर्ण झालेल्या इच्छुक उमेदवारांना २७ जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

SSC CGL 2024 : 17 हजारांपेक्षा अधिक जागांसाठी मागवले अर्ज

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

स्टाफ सिलेक्शन कमिशनने SSS CGL पदभरती (SSC CGL Recruitment) अंतर्गत विविध पदांच्या 17 हजार 727 रिक्त जांगासाठी (17 thousand 727 vacancies) अर्ज मागवले आहेत. आयोगाने यासंदर्भातील अधिसूचना  ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध (Notice published) केली आहे. ग्रॅज्युएशन पदवी पुर्ण झालेल्या इच्छुक उमेदवारांना २७ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना वाचावी. 

या भरतीद्वारे, SSC भारत सरकारच्या अंतर्गत विविध संस्था, विभाग आणि कार्यालयांसाठी उमेदवारांची भरती करणार आहे. SSC CGL भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ग्रुप B  आणि  ग्रुप C पदे भरली जातील. यामध्ये असिस्टंट अकाउंट ऑफिसर, इंस्पेक्टर, सब- इंस्पेक्टर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स, सीनियर सेक्रेट्रिएट असिस्टंट/ अपर डिविजन क्लर्क, ऑडिटर, टॅक्स असिस्टेंट, अकाउंटंट/ जूनियर अकाउंटंट,जूनियर स्टेट्सटिकल ऑफिसर आणि स्टेट्सटिकल इनवेस्टिगेटर ग्रेड- २ आदि पदांचा समावेश आहे. उमेदवाराचे वय 18 ते 32 वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी निकषांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात सवलत असेल.

उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. जे सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी/सहाय्यक लेखाधिकारी पदासाठी अर्ज करत आहेत.  त्यांच्याकडे पदवी आणि सीए/सीएस/एमबीए/कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट/कॉमर्समध्ये मास्टर्स/बिझनेस स्टडीजमध्ये मास्टर्स असणे आवश्यक आहे. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी (JSO) पदासाठी, मान्यताप्राप्त संस्थेची पदवी (12वी मध्ये किमान 60% गणित) आवश्यक आहे.

अर्ज कसा करायचा?

उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जावे. यानंतर ओटीआर (वन टाइम रजिस्ट्रेशन) वर तुमची नोंदणी करा. यशस्वी नोंदणीनंतर, अर्ज फॉर्मसह पुढे जा. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करा, अर्ज फी भरा आणि सबमिट करा. शेवटी भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.