नॅशनल कौन्सिल फाॅर हाॅटेल मॅनेजमेंट JEE नोंदणी प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज   

नॅशनल कौन्सिल फाॅर हाॅटेल मॅनेजमेंट JEE २०२४ परीक्षेला बसू इच्छिणारे उमेदवार exams.nta.ac.in/NCHM येथे उपलब्ध अधिकृत माहितीपत्रकातून तपशीलवार माहितीपत्रक डाउनलोड करू शकतात.

नॅशनल कौन्सिल फाॅर हाॅटेल मॅनेजमेंट JEE नोंदणी प्रक्रिया सुरू,  असा करा अर्ज   

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विविध शैक्षणिक प्रवेश परीक्षांना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नॅशनल कौन्सिल फाॅर हाॅटेल मॅनेजमेंट (NCHM)  संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु (Registration process started) झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ exams.nta.ac.in/NCHM या वर उमेदवारांना आपला अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत (Deadline till 31st March) देण्यात आली आहे. 

नॅशनल कौन्सिल फाॅर हाॅटेल मॅनेजमेंट JEE 2024 चा अर्ज भरण्यासाठी, उमेदवारांना प्रथम नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, नंतर तपशीलवार माहिती भरावी लागेल. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करुन अर्ज शुल्क भरावे लागेल. सर्व गोष्टींची खात्री करुन अर्ज पुर्ण करावा लागेल. 

नॅशनल कौन्सिल फाॅर हाॅटेल मॅनेजमेंट JEE २०२४ परीक्षेला बसू इच्छिणारे उमेदवार exams.nta.ac.in/NCHM येथे उपलब्ध अधिकृत माहितीपत्रकातून तपशीलवार माहितीपत्रक डाउनलोड करू शकतात. NCHM JEE 2024 माहितीपत्रकाद्वारे अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, परीक्षा केंद्रे आणि बरेच काही यासारखे तपशील उपलब्ध करून दिले आहेत. 

नोंदणी कशी करावी याची तपशीलवार माहिती खाली देण्यात आली आहे.. 

*  exams.nta.ac.in/NCHM ला भेट द्या.
* मुख्यपृष्ठावर उपलब्ध नोंदणी लिंकवर क्लिक करा.
* मूलभूत तपशील भरा आणि लॉगिन क्रेडेन्शियल तयार करा.
* अर्जाचा तपशील पूर्ण करा.
* संबंधित कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क भरा.