सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरु

ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२२ व जून / जुलै २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेले विध्यार्थी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरु
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत (SPPU) नुकताच १२२ वा पदवीप्रदान (Convocation) समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर विद्यापीठाचा १२३ वा पदवी प्रदान समारंभ सप्टेंबर / ऑक्टोबर  महिन्यात होणे अपेक्षित आहे. या पदवी प्रदान समारंभासाठी ऑनलाईन अर्जप्रक्रिया १ ऑगस्ट पासून सुरु करण्यात येणार आहे. पदवी प्राप्त करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र (Degree Certificate) विभागातर्फे करण्यात येत आहे. 

केवळ ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२२ व जून / जुलै २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना convocation.unipune.ac.in विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर दिलेल्या नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. विद्यार्थी १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत विनाविलंब शुल्कासह अर्ज करू शकतात. तर त्यांना १ सप्टेंबर ते १० सप्टेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. 

पुण्यातील विद्यार्थी आत्महत्येचे सत्र थांबेना; फर्ग्युसनच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२२ व जून / जुलै २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेले विध्यार्थी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहे. अर्जाचा नमुना, शुल्क आदीबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिली आहे. पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज योग्य शुल्कासह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागाकडून देण्यात आली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD