Mrunal Ganjale : मृणाल गांजाळे का ठरल्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या मानकरी?

मृणाल गांजाळे यांचे एम.ए. बी.एड. शिक्षण झाले असून मागील चौदा वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. या वाटचातील त्यांनी केलेल्या कामाची राज्य शासनासह विविध संस्था-संघटनांनीही दखल घेत सन्मानित केले आहे.

Mrunal Ganjale : मृणाल गांजाळे का ठरल्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या मानकरी?
Mrunal Ganjale

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय शिक्षक दिनी (National Teacher's Day) देशभरातील आदर्श शिक्षकांना मंगळवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (National Teachers' Award) देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराच्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव नाव म्हणजे मृणाल नंदकिशोर गांजाळे (Mrunal Ganjale). पुणे (Pune) जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महाळुंगे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतमध्ये त्या उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त करतानाच आपल्या कामाचे फलित म्हणजेच हा पुरस्कार असल्याचे म्हटले आहे.

 

मृणाल गांजाळे यांचे एम.ए. बी.एड. शिक्षण झाले असून मागील चौदा वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. या वाटचातील त्यांनी केलेल्या कामाची राज्य शासनासह विविध संस्था-संघटनांनीही दखल घेत सन्मानित केले आहे. पण राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पण या पुरस्काराच्या मानकरी होण्याचा मान त्यांना कसा मिळाला, अशी झाली त्यांची वाटचाल, हे पाहूयात.

शिक्षक भरती : पवित्र पोर्टलवर असा भरा अर्ज, महत्वाचे दहा मुद्दे वाचा...

पुरस्कार मिळाल्यानंतर याविषयी बोलताना मृणाल गांजाळे यांनी सांगितले की, जेव्हा शिकण्यात आनंद जोडला जातो, तेव्हा शिक्षण खऱ्या अर्थाने दर्जेदार होते. अध्ययन-अध्यापन प्रकियेला अधिकाधिक विद्यार्थीकेंद्रित आणि आनंददायी बनविण्यावर माझा भर आहे. शिक्षणाचा विद्यार्थ्यांना भविष्यात वापर करता यावा, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे शिक्षण मिळावे, त्यांच्यात २१ व्या शतकातील कौशल्ये विकसित व्हावीत, यासाठी जीवनाभिमुख शिक्षण देण्याचे माझे उद्दिष्ट आहे. ते साधण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा अभिनव वापर करत आहोत. याचेच फलित म्हणजे हा पुरस्कार. यामुळे आम्हाला आणखी काम करण्याची प्रेरणा मिळेल. हा पुरस्कार माझ्या सर्व विद्यार्थ्यांना समर्पित करते.

 

अध्ययन- अध्यापन प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा अभिनव वापर जगभरातील विद्यार्थ्यांना व्हर्चुअल प्रकारे शिक्षणाचे आदान-प्रदान, गेमी फिकेशन इन एज्युकेशन प्रकल्प, AR-VR चा वापर, असे वेगवेगळे तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग केले. ऑनलाइन शिक्षण, इतर देशातील शाळांशी थेट विद्यार्थ्यांचा संवाद, वेबसाइट मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर, राज्यातील इतर शिक्षकांना प्रशिक्षण, कोरोना काळात शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन अत्याधुनिक शिक्षण मृणाल गांजाळे यांनी दिले आहे.

 सत्या नडेला यांच्याकडून कामाचे कौतुक

सन २०१९-२०२० या वर्षात गांजाळे यांच्या शाळेतील इयत्ता पाचवीमध्ये शिष्यवृत्तीधारक १७ विद्यार्थी आणि ६ विद्यार्थी नवोदय  विद्यालयासाठी निवड पात्र ठरले आहेत. पंतप्रधान विद्या वाहिनी वर शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर सेशन मध्ये CIET-NCERT मार्फत तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले. मागील वर्षी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी देखील दिल्ली येथे शैक्षणिक कामाचे कौतुक करून सन्मान केला.

आगामी काळात कोणत्या गोष्टी साध्य कराव्याशा वाटतात, यावर बोलताना गांजाळे म्हणाल्या, विद्यार्थ्यांना सर्वांगीण, जीवनाभिमुख शिक्षण देण्यावर भर राहील. २१ व्या शतकातील कौशल्य आत्मसात करण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असेल. शांतता प्रिय वातावरण, समता आणि समानता या दृष्टीकोनातून शिक्षण देणे, शाळेत विविध नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्याकडे विशेष लक्ष असेल.

 

मृणाला गांजाळे यांना मिळालेले काही पुरस्कार व उल्लेखनीय कामगिरी

-              राष्ट्रीय ICT पुरस्कार २०१९

-              सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१-२२

-              शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन २०२२-२३

-              जिल्हा शिष्यवृत्ती तज्ञ मार्गदर्शिका पुरस्कार २०२०

-              राष्ट्रीय आय.सी.टी मेला २०२२

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j