विद्यापीठ बनले सेक्स स्कँडल आणि ड्रग्सचा अड्डा; केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा मास्टरमाईंड

पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने (एचईसी) या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन कुलगुरू आणि सुरक्षा एजन्सींच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठ बनले सेक्स स्कँडल आणि ड्रग्सचा अड्डा; केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा मास्टरमाईंड
Pakistan Sex Scandal

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सुमारे ५ हजार विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ, अंमली पदार्थांचा साठा आणि  यामागे चर्चेत असलेले त्याच विद्यापीठाचे कर्मचारी आणि इतर 'प्रतिष्ठित' नावे यामुळे सध्या पाकिस्तानमधील (Pakistan) एक विद्यापीठ वादात सापडले आहे. हे प्रकरण पाकिस्तानच्या इस्लामिया विद्यापीठ बहावलपूरशी संबंधित आहे. या विद्यापीठात गैरप्रकार सुरु असल्याची कुणकुण लागून पोलिसांनी (Police) या ठिकाणी छापेमारी केली. यावेळी धक्कादायक बाब समोर आली. या छाप्यात विद्यापीठ परिसरातून  ५ हजारांहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ आणि ड्रग्सचे साठे सापडले आहेत. (Sex Scandal in Pakistan University) 

पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने (एचईसी) या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन कुलगुरू आणि सुरक्षा एजन्सींच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.  वास्तविक, पोलिसांना या सेक्स स्कँडलची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा पोलिसांनी अबू बकर नावाच्या व्यक्तीला अटक केली. अबू बकर हा इस्लामिया विद्यापीठ बहावलपूरचा वरिष्ठ अधिकारी  असून त्याला २८ जून रोजी एका मुलीसोबत संशयास्पद स्थितीत पकडण्यात आले होते. चौकशीत त्याच्याकडून १० ग्रॅम चरस आढळून आला. त्याच्या मोबाईलमध्ये हजारो अश्लील व्हिडिओ सापडले असून, त्याद्वारे तो महाविद्यालयीन तरुणींचे शोषण करत असल्याचे समोर आले.   त्यानंतर कॉलेजचा सुरक्षा अधिकारी एजाज हुसैन याला अटक करण्यात आली आहे. 

पुण्यातील विद्यार्थी आत्महत्येचे सत्र थांबेना; फर्ग्युसनच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

धक्कादायक बाब म्हणजे  गेल्या अनेक वर्षांपासून इस्लामिया विद्यापीठात हा घाणेरडा खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे.  हे संपूर्ण प्रकरण ठरवून व्यवस्थित  प्लॅन करून अंमलात आणले जात होते. आधी ज्या मुलींना शिकण्याची आवड आहे पण परिस्थिती मुळे त्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही अशा मुलींना हेरले जायचे. अशा मुलींना शिष्यवृत्तीचे आमिष दाखवून फी माफ करण्याच्या बहाण्याने फसवले जायचे. पुढे त्यांचे अश्लील विडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल केले जायचे. 

पोलिसांना आतापर्यंत ५ हजाराहून  अधिक विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ सापडले आहेत.  याप्रकरणी आतापर्यंत ३ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. यामध्ये पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ मंत्रिमंडळात समाविष्ट असलेले केंद्रीय मंत्री चौधरी तारिक बशीर चीमा यांचा मुलगा इजाज शाह याचा मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच इजाज शाहला अटक केली आहे. सरकारची प्रतिमा डागाळू नये, यासाठी पोलिसांवरही दबाव आणला जात होता, अशी माहिती पाकिस्तानी माध्यमातून समोर येत आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD