पुण्यातील विद्यार्थी आत्महत्येचे सत्र थांबेना; फर्ग्युसनच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

वडारवाडी येथील विष्णू कुंज वसतिगृहात ओमने गळफास घेतला. गुरूवारी सायंकाळी ही घटना घडली असून घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नाही.

पुण्यातील विद्यार्थी आत्महत्येचे सत्र थांबेना; फर्ग्युसनच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मागील काही महिन्यांत विद्यार्थी आत्महत्येच्या (Suicide) घटनांनी पुणे (Pune) हादरून गेले आहे. आता गुरूवारी आणखी एक घटना घडली असून फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson College) बी. एस्सी. च्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ओम कापडणे ( वय १९) (Om Kapadane) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

वडारवाडी येथील विष्णू कुंज वसतिगृहात ओमने गळफास घेतला. गुरूवारी सायंकाळी ही घटना घडली असून घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नाही. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ओम हा मुळचा नाशिक जिल्ह्यतील असून शिक्षणासाठी पुण्यात आला होता.

शाळांमध्ये स्मार्टफोन वापरण्यावर आणावी बंदी; युनेस्कोने व्यक्त केली चिंता

फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेत पदवी तिसऱ्या वर्षात शिकत होता. तो राहायला विष्णू कुंज वसतिगृहात होता. याच वसतिगृहात त्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. चतु:शृंगी पोलीसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

पाच महिन्यांत चौथी आत्महत्या

विजय तुकाराम नांगरे (Vijay Nangare) (वय २१, रा. सामाजिक न्याय वसतीगृह, विश्रांतवाडी, मूळ गाव परभणी) या विद्यार्थ्याने मे महिन्यात शासकीय वसतिगृहात आत्महत्या केली होती. विश्रांतवाडी पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट आढळली होती. 'मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे. मी मुलगा म्हणून, भाऊ म्हणून काही करू शकलो नाही,' असे विजयने सुसाईड नोटमध्ये म्हटले होते.

तर मे महिन्यातच राज रावसाहेब गर्जे (वय २२) याने गोखलेनगर येथील विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली होती. तो डेक्कन येथील मराठवाडा मित्र मंडळ विधी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. मित्राच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले होते.

चार महिन्यांपूर्वी बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीने २९ मार्च रोजी सकाळी ससून रुग्णालयाच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. ती विद्यार्थिनी काही दिवसांपासून अभ्यास आणि परीक्षेच्या ताणामुळे अस्वस्थ होती. त्यामुळे आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD