Caste Validity Certificate : जात पडताळणीचे काम सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाच महिने एवढी मुदत शासनाने ठरविली आहे. मात्र, अनेक विदयार्थ्यांनी जुलै व ऑगस्ट मध्ये विलंबाने अर्ज सादर केल्याचे दिसून येते.

Caste Validity Certificate : जात पडताळणीचे काम सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार
Caste Validity

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या राखीव प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी (Caste Validity Certificate) विलंबाने अर्ज सादर केला आहे. तसेच त्रुटींबाबत कळवूनही अनेक विद्यार्थ्यांनी संबंधित कार्यालयांशी संपर्क साधलेला नाही. यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी जात पडताळणीचे कामकाज शनिवार व रविवारी या सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (Barti) महासंचालक सुनील वारे (Sunil Ware) यांनी सर्व जिल्हा जात पडताळणी समित्यांना दिले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२३ २४ मधील राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, कृषी शिक्षण, वैद्यकीय / आयुष शिक्षण आणि कला शिक्षण विभागाच्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राखीव प्रवर्गामधून प्रवेशासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाच महिने एवढी मुदत शासनाने ठरविली आहे. मात्र, अनेक विदयार्थ्यांनी जुलै व ऑगस्ट मध्ये विलंबाने अर्ज सादर केल्याचे दिसून येते. जुलै २०२३ अखेर सर्व समित्यांनी ४३ हजार ३५९ प्रकरणे निकाली काढली आहेत.

5th, 8th Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १ सप्टेंबरपासून भरता येणार ऑनलाईन अर्ज

CET CELL चे पात्र विद्यार्थी यांना त्रुटी पूर्तता करण्याबाबत Sms / Email व पत्राव्दारे संबंधित समित्यांमार्फत कळविण्यात आले आहे. तरीही अनेक अर्जदार/विद्यार्थी यांनी संबंधित समित्यांशी संपर्क साधलेला दिसून येत नाही. अर्जावरील त्रुटी पूर्तता करण्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी अर्जदारांची आहे. अर्जदारांची गैरसोय होऊ नये याकरिता सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांना सुट्टीच्या दिवशी शनिवार व रविवारी कार्यालय सुरु ठेवण्याचे आदेश वारे यांनी ऑनलाईन आढावा बैठकीमध्ये दिले आहेत.

जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये अर्जदार विद्यार्थ्यांनी अद्यापही वैधता प्रमाणपत्राबाबत त्रुटींची पूर्तता केलेली नाही, त्यांनी संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी त्वरीत संपर्क साधावा व त्रुटींची पूर्तता करावी जेणेकरुन समितीला विहित वेळेत निर्णय घेता येईल असे आवाहन सुनिल वारे यांनी केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo