विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड

प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच व्यवस्था व्यवस्थापन परिषदेसारख्या अतिउच्च अधिकार मंडळावर बिनविरोध निवड झाली आहे. यासाठी विद्यापीठ विकास मंचने पुढाकार घेतला होता. सर्व नवनियुक्त व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचे विद्यापीठ मंचाचे समन्वयक राजेश पांडे यांनी अभिनंदन केले आहे.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.डॉ. घोरपडे प्राचार्य गटातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर भरघोस मतांनी विजयी झाले होते. डॉ घोरपडे हे पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत ६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. डॉ. घोरपडे यांना अध्यापनाचा सतरा वर्षे व प्राचार्य पदाचा पंधरा वर्षे अनुभव आहे. त्यांनी चार वेळा अभ्यास मंडळ सदस्य, दोन वेळा अध्यक्ष, दोन वेळा फॅकल्टी सदस्य, दोन वेळा आर आर समिती सदस्य, दोन वेळा विद्यापरिषद सदस्य, बीसीयुडी उपसमिती सदस्य अशा विद्यापीठ अधिकार मंडळावर विविध समित्यांवर काम केले आहे.

या निवडीबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व विधानसभा विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अ‍ॅड. संदीप कदम, खजिनदार अ‍ॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव यांनी प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांचे अभिनंदन केले.

व्यवस्थापन परिषदेवरील सदस्य पुढील प्रमाणे

डॉ. राजेंद्र विखे पाटील (व्यवस्थापन गट)

प्राचार्य नितीन घोरपडे (प्राचार्य खुला गट)

डॉ. देविदास वायदंडे (एससी राखीव गट)

डॉ. धोंडीराम पवार (प्राध्यापक खुला गट)

डॉ. संदीप पालवे (एनटी गट)

बागेश्री मंथाळकर (पदवीधर खुला गट) 

सागर वैद्य (इतर मागासवर्गीय गट)