जगाचे दूत म्हणून सेवा देण्यासाठी तयार व्हा! शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

कोणतेही काम करण्यात कमीपणा नसतो हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी श्रमाची महती समजून घ्यावी आणि  माणुसकी जपावी असा सल्लाही केसरकर यांनी दिला.

जगाचे दूत म्हणून सेवा देण्यासाठी तयार व्हा! शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
School Education Minister Deepak Kesarkar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात (Maharashtra) नवीन शैक्षणिक वर्षाला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले जात असून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनीही विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. शालेय शिक्षण विभाग (School Education Department) विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज असून विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षण घेऊन यशस्वी व्हावे, अशा शब्दात केसरकर यांनी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व असल्याचे सांगत केसरकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यात आले असून एकाच पुस्तकामध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. याच पुस्तकात नोंदी घेण्यासाठी वह्यांची पाने देण्यात आली आहेत. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, सॉक्स देण्यात येणार आहेत. शेतीचे ज्ञान आवश्यक असल्याने यापुढे शेती विषय शिकविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वारे गुरूजींनी करून दाखवलं; उजाड माळरानावर उभारली आंतरराष्ट्रीय शाळा

कोणतेही काम करण्यात कमीपणा नसतो हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी श्रमाची महती समजून घ्यावी आणि  माणुसकी जपावी असा सल्लाही केसरकर यांनी दिला. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा आणि महाराष्ट्रासह देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा, अशी अपेक्षा केसरकर यांनी व्यक्त केली.

जगातील सर्वात तरूण देश म्हणून जगाला उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करावा. या कामी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शासन विद्यार्थ्यांच्या सोबत असून जगाचे दूत म्हणून सेवा देण्यासाठी तयार व्हावे, असेही केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo