AISSMS अभियांत्रिकी महाविद्यालयात "आयसीओजीई-२०२३ आंतरराष्ट्रीय परिषद"

एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाने येत्या १६ व १७ मे २०२३ रोजी 'इंटरनॅशनल कॉन्फरेन्स ऑन ग्रीन एनर्जी - २०२३' चे  आयोजन केले आहे.

AISSMS अभियांत्रिकी महाविद्यालयात "आयसीओजीई-२०२३ आंतरराष्ट्रीय परिषद"

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी पर्वाचे औचित्य साधत सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडियाच्या (सेसी ) Solar Energy Society of India वेस्टर्न रिजनल चॅप्टरच्या संयुक्त विद्यमाने एआयएसएसएमएस  अभियांत्रिकी महाविद्यालयाने AISSMS College of Engineering येत्या १६ व १७ मे २०२३ रोजी 'इंटरनॅशनल कॉन्फरेन्स ऑन ग्रीन एनर्जी - २०२३' चे 'International Conference on Green Energy - 2023' आयोजन केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर Dr. Pandit Vidyasagar Former Vice-Chancellor Swami Ramanand Teerth Marathwada University यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचे उदघाटन होणार आहे.
        अक्षय ऊर्जेचे सर्व पैलू व महत्व मांडून विशेषतः सौर ऊर्जेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारतातील तसेच परदेशातील अक्षय ऊर्जा संशोधक,शिक्षणतज्ज्ञ,धोरण निर्माते आणि उद्योगपतींना एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देणे,हे  या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट्य असून जास्तीत जास्त संशोधकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष व एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री.डी.एस.बोरमने यांनी केले . 
          पाश्चिमात्य राष्ट्र आणि संपूर्ण देशभरातून या परिषदेसाठी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन व ऑफलाईन या मोडमध्ये होणा-या परिषदेत विद्यार्थी व प्राध्यापकांनी या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन  परिषदेचे संयोजक प्रा.नितीन मावळे व परिषदेचे समन्वयक डॉ.यु.एस.आवारी यांनी केले.