पहिल्याच दिवशी अनधिकृत शाळांचे फुटणार बिंग; शिक्षण विभागाच्या शाळांना भेटी  

जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत शाळा अजूनही सुरू आहेत. त्यातच बारामती व आंबेगाव परिसरात नव्याने अनधिकृत शाळा सापडल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून दिली जात आहे.

पहिल्याच दिवशी अनधिकृत शाळांचे फुटणार बिंग; शिक्षण विभागाच्या शाळांना भेटी  
Bogus Schools in Maharashtra

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने (School Education Department) अनधिकृत शाळांवरील (Bogus Schools) जोरदार कारवाई सुरू केली. मात्र अजूनही अनेक शाळा बंद झालेल्या नाहीत. उलट अनधिकृत शाळांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचे अधिकारी शाळा (Schools in Pune) सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासूनच संबंधित शाळांना प्रत्यक्षात भेटी देणार आहेत. त्यामुळे या शाळा बंद आहेत की अजूनही सुरू आहेत; याचे बिंग लवकरच फुटणार आहे. (Visits to Bogus schools by the Department of Education)

पुणे महानगरपालिकेच्या (PMC) शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत (Minakshi Raut) म्हणाल्या, शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पालिकेच्या शाळा जय्यत तयारी केली तसेच शाळा सुरू करताना प्रशासकीय अडचणी येऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने रखडलेल्या मुख्याध्यापकांना पदोन्नती दिली त्यामुळे शाळांना १३७ पूर्णवेळ मुख्याध्यापक मिळाले आहेत. तसेच १५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये २५ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.

वारे गुरूजींनी करून दाखवलं; उजाड माळरानावर उभारली आंतरराष्ट्रीय शाळा

राऊत म्हणाल्या, पुणे महानगरपालिका हद्दीत १७ अनधिकृत शाळा होत्या त्यातील असाच शाळा बंद करण्यात आम्हाला यश आले आहे. उरलेल्या दहा शाळांपैकी एका शाळेला शासनाकडून मान्यता मिळाले. त्यामुळे आता पालिका हद्दीत नऊ अनधिकृत शाळा आहेत. गुरुवारपासूनच क्षेत्रीय अधिकारी संबंधित शाळेला भेटी देऊन शाळा बंद आहे की सुरू आहे, याबाबतचे तपासणी करणार आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत शाळा अजूनही सुरू आहेत. त्यातच बारामती व आंबेगाव परिसरात नव्याने अनधिकृत शाळा सापडल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून दिली जात आहे. जून महिना उजाडला तरीही शिक्षण विभागाला अनधिकृत शाळांवर कारवाई करून त्या बंद करता आल्या नाहीत,हे स्पष्ट होत आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo