एसपीएम इंग्लिश स्कूलचा पारितोषिक वितरण समारंभ

शालेय स्पर्धांमध्ये आणि विशेष शैक्षणिक प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिके देण्यात आले. त्याचप्रमाणे शाळेच्या सेवेत गेल्या २५ वर्षांपेक्षा अधिक काळ रुजू असणाऱ्या शिक्षका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

एसपीएम इंग्लिश स्कूलचा पारितोषिक वितरण समारंभ

 एस पी एम इंग्लिश स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी शाळेतील विविध स्पर्धा , अंतर शालेय स्पर्धांमध्ये आणि विशेष शैक्षणिक प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिके देण्यात आले. त्याचप्रमाणे शाळेच्या सेवेत गेल्या २५ वर्षांपेक्षा अधिक काळ रुजू असणाऱ्या शिक्षका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका स्मिता पानसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.तसेच शाळा समितीचे सदस्य मेहेर प्रभुदेसाई, श्री पटवर्धन, काळकर आदी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी आणि कोऑर्डिनेटर कविता सिंगर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम पार पडले.