पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार

प्रा. मोकाट यांनी गेल्या दोन दशकात वनस्पती संवर्धन, रोपे निर्मिती, पर्यावरण विषयी जनजागृती, वनस्पती-वने-औषधी वनस्पती विषयांची प्रकाशाने या मध्ये उल्लेखनीय काम केले आहेत.

पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार
Chhatrapati Shivaji Maharaj Vanashree Award to Department of Botany

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामार्फत दिला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार (Vanashree Award) देऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) वनस्पतीशास्त्र विभागाचा गौरव करण्यात आला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वनस्पती संवर्धन, रोपे निर्मिती, पर्यावरण विषयी जनजागृती आदी कामांची दखल घेत शासनाकडून हा पुरस्कार दिला गेला.

यशदा येथे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलॉ यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. संजीव सोनावणे, विभागप्रमुख प्रा. ए.बी. नदाफ व प्रा. दिगंबर मोकाट यांनी पुरस्कार स्वीकारला. प्रा. दिगंबर मोकाट यांच्या वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन यामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय प्रथम व विभागस्तर प्रथम असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. यात रोख रु. एक लाख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, इ. चा समावेश आहे.

हेही वाचा : मोठी बातमी : पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

प्रा. मोकाट यांनी गेल्या दोन दशकात वनस्पती संवर्धन, रोपे निर्मिती, पर्यावरण विषयी जनजागृती, वनस्पती-वने-औषधी वनस्पती विषयांची प्रकाशाने या मध्ये उल्लेखनीय काम केले आहेत. औषधी वनस्पती विषयाचे त्यांचे कार्य अनमोल आहेत. पुरस्कार प्राप्त झाले बद्दल प्रा. दिगंबर मोकाट व विभागाचे अभिनंदन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू प्रा. संजीव सोनावणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले आहेत.

या पुरस्काराच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाने दखल घेतली आहेत. या कार्यक्रमावेळी वनविभागातील प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक वाय. एल. पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण  डॉ. सुनीता सिंग, महाराष्ट्र राज्य, अमोल थोरात, विभागीय वन अधिकारी, पुणे  व हनुमंत धुमाळ, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे आदी उपस्थित होते.