मोठी बातमी : पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

परिषदेमार्फत ही शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. इयत्ता पाचवीच्या परीक्षेसाठी ५ लाख ३२ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी तर आठवीच्या परीक्षेसाठी ३ लाख ६७ हजार ७९६ अशा एकूण ९ लाख ६५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

मोठी बातमी : पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर
Scholarship Examination Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी)पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा (5th 8th standard scholarship result) अंतरिम निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. पाचवीचे १ लाख १३ हजार ९३८  विद्यार्थी आणि आठवीचे ५५ हजार ५५७  विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.यंदा प्रथमच एप्रिल महिन्यात निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षी साधारणपणे जून ते जुलै महिन्यात निकाल जाहीर होतात. 

परिषदेमार्फत ही शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. इयत्ता पाचवीच्या परीक्षेसाठी ५ लाख ३२ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी तर आठवीच्या परीक्षेसाठी ३ लाख ६७ हजार ७९६ अशा एकूण ९ लाख ६५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती , अशी माहिती परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे (Shailaja Darade) यांनी दिली.

हे ही वाचा :  पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेला जुलै महिन्यातच सुरूवात

निवडयादी व गुणयादी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in  https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर पाहता येईल. शाळांनी व विद्यार्थ्यांनी हा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घ्यावा लागेल. विद्यार्थ्याचे गुणपत्रक काही दिवसांनी शाळा लॉगीनवर देण्यात येईल. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (योजना) यांच्यामार्फत केले जाणार आहे. 

-----------------

विभागनिहाय शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल        

मुंबई विभागातून पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ५४ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ५१ हजार ७८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामधून ९ हजार २१८ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र झाले आहेत. तर इयत्ता आठवीच्या ३९ हजार २७६ विद्यार्थ्यांपैकी ३७ हजार ४०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ७ हजार ८५६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.                      

पुणे विभागातून १ लाख ११ हजार ४९८ विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १ लाख ८ हजार १३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या परीक्षेतून २९ हजार ४४४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. तर इयत्ता आठवीचे १३ हजार ३०३ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.  

 नाशिक विभागातील इयत्ता पाचवीचे ११ हजार २२९ विद्यार्थी तर इयत्ता आठवीचे ६ हजार ७८९ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले. कोल्हापूर विभागामधील इयत्ता पाचवी चे २४ हजार २०३ विद्यार्थी तर इयत्ता आठवीचे १० हजार ३५२ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. औरंगाबाद विभागामधील पाचवीचे १२ हजार ४०१ विद्यार्थी तर आठवीचे 5331 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले. अमरावती विभागातील पाचवीचे १० हजार ३४२ विद्यार्थी तर आठवीचे ४ हजार ८९६  विद्यार्थी पात्र ठरले. नागपूर विभागामधील पाचवीचे ७ हजार ६७९ विद्यार्थ्यांनी तर आठवीचे २ हजार ८७७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र ठरले आहेत. लातूर विभागातील पाचवीचे ९ हजार ४२१ विद्यार्थी तर आठवीचे ४ हजार १४४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले.

-----------------------