प्रत्येक सामान्य व्यक्तीला उत्तम उपचार मिळालेच पाहिजेत

लठ्ठपणा, स्तनाचा कर्करोग, मधुमेह इत्यादी आजारांसाठी महाराष्ट्र शासनाने समाजात जनजागृती कार्यक्रम सुरू केला असून समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे हा आमचा उद्देश आहे. असे मत डीएमईआरचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी व्यक्त केले.

प्रत्येक सामान्य व्यक्तीला उत्तम उपचार मिळालेच पाहिजेत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क / पुणे 

भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून आमचा भर प्रामुख्याने आरोग्य क्षेत्रावर आहे. लठ्ठपणा, स्तनाचा कर्करोग, मधुमेह इत्यादी आजारांसाठी महाराष्ट्र शासनाने समाजात जनजागृती कार्यक्रम सुरू केला असून समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे हा आमचा उद्देश आहे. प्रत्येक सामान्य व्यक्तीला उत्तम उपचार हे मिळालेच पाहिजेत, असे मत डीएमईआरचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी व्यक्त केले. 

  सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेतर्फे " सिमहेलथ "  या २५ व्या  राष्ट्रीय  परिषदेच्या  समारोप समारंभात  डॉ. दिलीप म्हैसेकर बोलत होते. यावेळी डॉ. सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष  डॉ. शां. ब. मुजुमदार, सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्रोव्होस्ट डॉ. राजीव येरवडेकर,  सिंबायोसिसचे वैद्यकीय प्रकल्प सल्लागार, डॉ.अरुण जामकर, डॉ. प्रवीण शिनगारे, लेफ्टनंट जनरल एम. ए. तुटाकणे आदी उपस्थित होते. 

       डॉ. म्हैसेकर म्हणाले, केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांनी देशातील गंभीर कोविड परिस्थिती ही अतिशय चांगल्या प्रकारे हाताळली. सुरुवातीला कोविडवर उपचार करण्यासाठी औषधे किंवा इतर कोणत्याही उपायांबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असूनही रुग्णांना उपचार देणे, मानसिक आधार देणे इत्यादी गोष्टी एकत्रितपणे हाताळण्यात यश आले आहे. 

डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, जरी कोरोनाने संपूर्ण जगामध्ये मोठे असंतुलन निर्माण केले असले तरी कोरोनाने आपल्या सर्वाना जीवनात काही महत्त्वाच्या गोष्टीही शिकवल्या आहेत . जसे कि आपल्या आरोग्याची काळजी घेणे, अनिश्चितता - जीवन हे अनिश्चित आहे आणि आयुष्यात काही प्रमाणात अध्यात्मिक होणे गरजेचे आहे.