School News : अखेर मणिपूरमधील शाळांची घंटा पु्न्हा वाजणार, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये १ हजार २२९ शाळा आहेत, जिथे इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग विविध व्यवस्थापनांद्वारे चालवले जातात.

School News : अखेर मणिपूरमधील शाळांची घंटा पु्न्हा वाजणार, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

दंगलीमुळे होरपळून निघालेले मणिपूर (Manipur) राज्य आता हळू हळू पूर्व पदावर येऊ पाहत आहेत. सुमारे ३ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा (Schools in Manipur) आता सुरु होणार आहेत. राज्यातील ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग १० ऑगस्टपासून सुरु होणार आहेत. या संदर्भात मणिपूरच्या शालेय शिक्षण संचालनालयाने (Education Department) सर्व विभागीय शिक्षणाधिकाऱ्यांना आणि संबंधितांना कळवून त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यास सांगितले आहे.

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये १ हजार २२९ शाळा आहेत, जिथे इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग विविध व्यवस्थापनांद्वारे चालवले जातात. यापैकी शाळा पुन्हा सुरु करण्याचा आदेश २८ शाळांना लागू होणार नाही. कारण तिथे सध्या रिलीफ कॅम्प सुरु  करण्यात आले आहे. या शाळा पुन्हा सुरू करण्याचे स्वतंत्र आदेश नंतर जारी केले जातील, या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पुरेशा नुकसान भरपाईच्या उपाययोजना केल्या जातील जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही. 

दहावी, बारावी परीक्षेची मोठी अपडेट; फॉर्म नं. १७ भरा ऑनलाईन, बोर्डाने दिली माहिती

दरम्यान, दंगलीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून देशभरातील राज्य शिक्षण मंडळ आणि इतर शैक्षणीक बोर्ड पुढे सरसावले आहेत. या विद्यार्थ्यांना दंगली दरम्यान देशात कोणत्याही शाळेत किंवा महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून तिथल्या शिक्षण मंडळाने प्रवेशाचे नियम शिथिल केले होते. दिल्ली, केरळ,  आंध्र प्रदेश, कर्नाटक, आसाम आदी राज्यांनी मणिपूरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देताना कोणत्याही कागद्पत्रकांची सक्ती करू नये असे आदेश काढले होते. शिवाय या विद्यार्थ्यांसाठी त्या-त्या राज्यातील स्थानिक भाषा विषय शिकण्याची सक्ती हटवण्यात आली होती.

आता दंगली दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी इतर राज्यांच्या शाळेत प्रवेश घेतले आहेत, त्यांना परत बोलावणार का की ते विद्यार्थी सध्या ज्या राज्यात शिक्षण घेत आहेत, तिथेच त्यांना पुढेही शिकू दिले जाईल, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo