MBBS ला प्रवेश मिळेल का? राज्यातील शासकीय व खाजगी महाविद्यालयांचे कटऑफ पहा एका क्लिकवर

महाराष्ट्रातील सर्व नामांकित शासकीय, अनुदानित व खासगी महाविद्यालयांचे प्रवर्गनिहाय कटऑफ, त्यामध्ये प्रवेश मिळालेल्या पहिल्या व शेवटच्या विद्यार्थ्याचे गुण, या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक आदी माहिती विद्यार्थ्यांना पाहता येईल.

MBBS ला प्रवेश मिळेल का? राज्यातील शासकीय व खाजगी महाविद्यालयांचे कटऑफ पहा एका क्लिकवर
MBBS Cutoff in Maharashtra

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नीट परीक्षेचा (NEET UG 2023) निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसह पालकांना वेध लागले आहेत ते प्रवेशाचे. (Medical Colleges in Maharashtra) परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार एमबीबीएस (MBBS) अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल का, शासकीय महाविद्यालयाचे कटऑफ (Government College CutOff), मागील वर्षीचे पहिल्या फेरीचे, शेवटचे कटऑफ किती, प्रवर्गनिहाय कटऑफ, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत असतील. या बातमीमध्ये विद्यार्थ्यांचे या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. (MBBS Admission)

महाराष्ट्रातील सर्व नामांकित शासकीय, अनुदानित व खासगी महाविद्यालयांचे प्रवर्गनिहाय कटऑफ, त्यामध्ये प्रवेश मिळालेल्या पहिल्या व शेवटच्या विद्यार्थ्याचे गुण, या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक आदी माहिती विद्यार्थ्यांना पाहता येईल. यंदा नीट परीक्षेत २ लाख ७७ हजार ९०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ १ लाख ३१ हजार ८ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

विद्यार्थ्यांना मराठी नकोशी; 'नीट'चे आकडे पाहिल्यावर बसेल धक्का

पहिल्या शंभरातही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का कमी आहे. देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या दोन विद्यार्थ्यांना ७२० गुण असून महाराष्ट्रात पहिला असलेल्या विद्यार्थ्याला ७१५ गुण आहेत. तो ऑल इंडिया रँकिंगमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. पहिल्या ५० विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील केवळ तीन विद्यार्थ्याचा समावेश आहे.

मागील वर्षी महाराष्ट्रातील शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळालेल्या शेवटच्या विद्यार्थ्याचे नीटचे गुण ६५० च्या खाली आहेत. खुल्या गटात मुंबईतील जीएसएमसी महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या शेवटच्या विद्यार्थ्याचे गुण ६३७ एवढे होते. तर ओबीसीसाठी ४४२ आणि एससीसाठी ५५२ चा कटऑफ होता. तर पुण्यात बी. जे. मेडिकल कॉलेजमधील शेवटच्या विद्यार्थ्याला ५७० गुण होते. ओबीसी व एससीसाठी अनुक्रमे ६२० व ५५६ कटऑफ होता.

MHT CET च्या निकालात पुण्याचे वर्चस्व; टॉपर्सच्या यादीत सात पुणेकर

मागील वर्षी १५ शासकीय महाविद्यालयांचे कटऑफ (महाविद्यालयाच्या नावापुढे खुला गट, एससी व ओबीसी प्रवर्गातून प्रवेशित शेवटच्या विद्यार्थ्याचे गुण) -

  • जीएमसी, मुंबई – ६२६, ५४७, ६१५
  • टिळक एमसी, मुंबई – ५८४, ४७५, ६०७
  • नायर एमसी, मुंबई – ६२७, ५१७, ६०८
  • जीएसएमसी, मुंबई – ६३७, ५५२, ४४२
  • आरजीएमसी, कळवा – ६०७, ४९९, ५८९
  • बीजेएमसी, पुणे – ५७०, ५५६, ६२०
  • व्हीएमएमसी, सोलापूर – ५९२, ४६०, ५८७
  • जीएमसी, मिरज – ५८६, ४८८, ५७३
  • जीएमसी, कोल्हापूर – ५८६, ४६७, ५७७
  • एचबीटी आणि कुपर एमसी, मुंबई – ६१३, ५०८, ६०१
  • जीएमसी, बारामती – ५९०, ४८९, ५८१
  • जीएमसी, नागपूर – ६१०, ५०८, ६०२
  • एमजीआयएमएस, वर्धा – ५९१, ४८३, ५८१
  • जीएमसी, औरंगाबाद – ६०४, ५०८, ५९४
  • डॉ. एस. सी. जीएमसी, नांदेड – ५८४, ४९२, ५७५                                                                                                                                                                                                                                                                                                                                                      या लिंकवर पहा सविस्तर माहिती : file:///C:/Users/User1.User/OneDrive/Desktop/Photo/FirstLst-UG.pdf

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo