MHT CET च्या निकालात पुण्याचे वर्चस्व; टॉपर्सच्या यादीत सात पुणेकर

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) या गटात १४ आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) या गटात १४ जणांना शंभर पर्सेंटाईल मिळाले आहेत.

MHT CET च्या निकालात पुण्याचे वर्चस्व; टॉपर्सच्या यादीत सात पुणेकर
MHT CET 2023 Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा चाचणी सेलकडून (CET Cell) घेण्यात आलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या (MHT CET 2023) निकालात पुण्याचे (Pune) वर्चस्व राहिले आहे. परीक्षेत एकूण २८ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाईल मिळाले असून त्यामध्ये सर्वाधिक सात विद्यार्थी पुण्यातील आहेत. तसेच टॉपर्सच्या यादीत १३ मुलींनीही स्थान पटकावले आहे.

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) या गटात १४ आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) या गटात १४ जणांना शंभर पर्सेंटाईल मिळाले आहेत. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी ही परीक्षा अनिवार्य आहे. परीक्षेसाठी एकूण ६ लाख ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख ३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी पीसीएम (PCM) तर २ लाख ७७ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी पीसीबी गटासाठी नोंदणी केली होती.

ITI Admission : पाच महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष कराल तर प्रवेशाला मुकाल! सविस्तर वेळापत्रक जाहीर

एकूण २८ जणांच्या टॉपर्सच्या यादीत पुण्यातील तनिष चुडीवाल, अपुर्वा महाजन, कृष्णा काब्रा, अबोली माळशिकारे, मृण्मयी भालेराव सेजल राठी आणि आर्या तुपे यांचा समावेश आहे. या यादीत मुंबईतील पाच विद्यार्थी तर ठाण्यातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. १०० पर्सेंटाईल मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये खुल्या गटातील २४ जण आहेत. तर तन्मयी संगेवार आणि मनोमय पवार हे ओबीसी गटातील टॉपर्स आहेत. या गटात वेदांत पांडे दुसऱ्या क्रमांकावर आहे.

एससी गटात आयुष्य रामटेके (पीसीबी – ९९.९९५७१७२) आणि योग सोनवणे (पीसीएम – ९९.९५८७३९७) हे दोघे टॉपर्स आहेत. एसटी गटात विवेक सुरेवाड (पीसीबी – ९९.९६४१३२०) व अथर्व बच्चावार (पीसीएम – ९९.८९१८७५८) हे अव्वल ठरले आहेत. एनटी १ गटात शशांक दादुरिया (पीसीएम – ९९.९७९५६२६) आणि आर्यन अंबरखाने (पीसीबी – ९९.९७४०९४४) यांनी बाजी मारली.

इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्याची शेवटची संधी; बोर्डाने दिली मुदतवाढ

एनटी २ मध्ये अबोली माळशिकारे (पीसीएम) शंभर पर्सेंटाईलसह प्रथम आहे. तर मंथन वाडे (पीसीबी – ९९.९९५७२२१) दुसऱ्या क्रमांकावर आहे. एनटी ३ गटात विपुल वंजारी (पीसीबी – ९९.९४८६०५९) व वेदांत वंजारी (पीसीएम – ९९.९१७२२१७) तर डीटी/व्हीजे गटात अखिलेशसिंग परदेशी (पीसीबी – ९९.९२३७८०५) व अंकित केसरोड (पीसीएम – ९९.९२२३३८०) यांना अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक मिळाला.

पीसीएम गटातील टॉपर्स (शंभर पर्सेंटाईल)

  • अविनाश जनार्दन चौधरी (मुंबई शहर)
  • अनुष्का पियुष दोषी (मुंबई शहर)
  • तनिष निलेश चुडीवाल (पुणे)
  • अपुर्वा प्रकाश महाजन (पुणे)
  • विराज मनकानी (मुंबई शहर)
  • सुकेतू पराग पाटनी (ठाणे)
  • प्रांजल मालपाणी
  • कृष्णा महेश काब्रा (पुणे)
  • ईशान अमित फणसे (ठाणे)
  • अबोली माळशिकारे (पुणे)
  • असिफ नझीर हुसेन (नागपूर)
  • चैतन्य विश्वास ब्रम्हपुरीकर (औरंगाबाद)
  • मृण्मयी विद्याधर भालेराव (पुणे)
  • वैभवी सुहास पवार (कोल्हापूर)

पीसीबी गटातील टॉपर्स (शंभर पर्सेंटाईल)

  • आदित्य ज्ञानदिप यादव (मुंबई उपनगर)
  • शेषाद्री रामकृष्णन अय्यर (मुंबई उपनगर)
  • सेजल रमेश राठी (पुणे)
  • आदित्य निनाद राणे (पालघर)
  • श्रृतम दीपक दोशी (सातारा)
  • तन्मयी सुनिलदत्त संगेवार (कोल्हापूर)
  • अनिमेश नागेशकुमार शिंदे (मुंबई शहर)
  • मनोमय ऋषिकेश पवार (नाशिक)
  • अर्पण संदीप कासट (अमरावती)
  • वैष्णवी सुरेश मोरे (सातारा)
  • शैवी विश्वास बालवटकर (मुंबई शहर)
  • आर्या तुपे (पुणे)
  • वैष्णवी अभय झा (ठाणे)
  • श्रेयस अविनाश देशपांडे (रायगड)

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo