सीईटी-सेलने खाजगी विद्यापीठांसाठी रखडवली व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ? 

सीईटी सेलच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास सातत्याने विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. एमएच-सीईटी परीक्षेचा निकाल १२  जून रोजी जाहीर झाला. परंतु, अद्याप प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले नाही.

 सीईटी-सेलने खाजगी विद्यापीठांसाठी रखडवली व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ? 
CET Cell News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कोरोनामुळे सर्वच विद्यापीठांचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे. त्यातच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (professional courses) प्रवेश प्रक्रियेला सातत्याने उशीर होत आहे. राज्य सामायिक प्रवेश पूर्व परीक्षा कक्षाच्या  (सीईटी सेल) (State Common Entrance Test Cell ) माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षांचे निकाल (cet exam result)  जाहीर झाले असले तरी अद्याप या अभ्यासक्रमांचे वेळापत्रक प्रसिध्द करून  प्रवेश प्रक्रिया (cet cell admission time table ) सुरू केली नाही. त्यामुळे केवळ खाजगी विद्यापीठांच्या (private University) भल्यासाठी शासकीय व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस सीईटी-सेलकडून (cet cell) विलंब केला जात आहे ? असा चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.

 
 सीईटी सेलच्या माध्यमातून एमबीए, इंजीनियरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, एग्रीकल्चर अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची  प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. तर राज्यातील खाजगी विद्यापीठांमधील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रिमिनेंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन (पेरा) ही प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाते. मागील वर्षी 'एमबीए सीईटी'चा निकाल जाहीर झाला त्यानंतर सुमारे एक महिन्याने एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. तत्पूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश खाजगी विद्यापीठांमध्ये निश्चित केला होता. सीईटी सेलच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास सातत्याने विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. एमएच-सीईटी परीक्षेचा निकाल १२  जून रोजी जाहीर झाला. परंतु, अद्याप प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले नाही. त्यामुळे इंजीनियरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर ॲग्री आदी अभ्यासक्रमास प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना  इतर पारंपारिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन ठेवावा लागत आहेत.

व्यसनी शिक्षकांनो खबरदार! शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली मोठी घोषणा, लवकरच परिपत्रक काढणार


सध्या खाजगी विद्यापीठांनी दुसऱ्या सीईटी परीक्षेची तयारी सुरू केली आहे. राज्य शासनाची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी खाजगी विद्यापीठांची दुसऱ्या सीईटीची प्रवेश प्रक्रिया सुध्दा पूर्ण होईल. परिणामी आपोआपच शासनातर्फे उशिरा राबविल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतून विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना कमी विद्यार्थी मिळतील. सीईटी सेलच्या या उदासीन भूमिकेमुळे राज्यातील अनेक विनाअनुदानित महाविद्यालय विद्यार्थी मिळेत नसल्याने बंद पडली आहेत तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सध्या केवळ विधी व बीएड या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रकल्प सुरू झाली आहे.मात्र, उर्वरित अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार याचे उत्तर ' सीईटी सेल'शी संपर्क करूनही मिळत नाही. 

अनेक विद्यार्थी शासकीय व खाजगी अशा दोन्ही सीईटी परीक्षा देतात.परंतु, खाजगी विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होत असल्याने अनेक विद्यार्थी खाजगी विद्यापीठांमध्येच प्रवेश घेतात. परिणामी शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा या विद्यार्थ्यांना लाभ मिळत नाही.  तसेच शासकीय महाविद्यालयातील अभ्यासक्रमांच्या शुल्का पेक्षा खाजगी विद्यापीठांचे शुल्क सुमारे पाचपट जास्त असते.विद्यार्थी व पालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे खाजगी विद्यापीठांचे भले करण्यासाठीच सीईटी सेल प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यास विलंब करत आहे? अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.

शिक्षणतज्ज्ञ आमनेसामने; 'ते' ३३ शिक्षणतज्ज्ञ राजकीय अजेंडा पुढे रेटत असल्याचा ७१ जणांचा गंभीर आरोप

दरवर्षी होतो विलंब

" गोवा राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी वेगवेगळे  वेळापत्रक जाहीर केले जात नाही.तर एकाच वेळी प्रसिध्द होते. महाराष्ट्रात मात्र विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग , आर्किटेक्चर , फार्मसी आशा प्रत्येक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी वेळापत्रकानुसार स्वतंत्रपणे प्रवेश अर्ज भरावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ उडतो. तसेच सीईटी सेलच्या माध्यमातून दरवर्षी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास विलंब केला जातो. त्यामुळे उच्च शिक्षण विभागाने यात सुधारणा करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यायला हवा." 

- रामदास  झोळ, अध्यक्ष , असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूट इन रुरल एरिया

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo