पोलीस भरतीचे अर्ज भरताना उमेदवारांची हेळसांड; मुदतवाढीची मागणी

अर्ज भरण्यास कमीत कमी एक महिन्याची मुदवाढ देण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सरकारकडे केली आहे.

पोलीस भरतीचे अर्ज भरताना उमेदवारांची हेळसांड; मुदतवाढीची मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पोलीस भरतीचा (police recruitment) फाॅर्म भरण्यास मराठा समाजातील उमेदवारांची हेळसांड होत आहे. SEBC प्रमाणपत्र मिळत नाही. फाॅर्म  कोणत्या प्रवर्गातून भरावा हे सरकारने स्पष्ट करावे. तसेच अर्ज भरण्यास कमीत कमी एक महिन्याची मुदवाढ (One month increment) देण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination Coordination Committee) सरकारकडे (Gov. Maharashtra) केली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च आहे. 

पोलिस भरतीसाठी राज्य सरकारने मराठा आरक्षण मोठ्या थटात लागू केले. मात्र, ऐन परीक्षेच्या वेळी लागू केलेल्या या आरक्षणामुळे कागदपत्र काढण्यासाठी मराठा उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होताना तोंडावर आली आहे. कागदपत्रांसाठी १२ ते १५ दिवसांचा कालावधी लागत असताना अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांचे नुकसाई होऊ नये हा हेतू मनात ठेवून गृह विभागाने अर्ज दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

राज्य सरकाने १७ हजार ४३० जागांवरील पोलिस भरतीसाठी ५ ते ३१ मार्च या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक केले आहे. या  भरती प्रक्रियेमध्ये १० टक्के जागा मराठा समाजातील उमेदवारांसाठी आरक्षित ठेवण्यात आला आहेत. त्यासाठी काही कागदपत्रांची पुर्तता करणे गरजेचे असून त्यासाठी मोठा वेळ जात आहे, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.  

मराठा समाजातील तरुणांना एसईबीसी (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक), नाॅनक्रिमिलेअर यांसारखे कागदपत्र काढण्यासाठी काही तांत्रिक कारणांमुळे वेळ लागत आहे. त्यामुळे उमेदवारांच्या भविष्याचा विचार करुन वाढीव कालावधी देण्यात यावा, अशी मागणी मागील काही दिवसांपासून होताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात गृह विभाग काय निर्णय घेणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.