Talathi Bharti : गैरप्रकार होण्याची दाट शक्यता! स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केले सतर्क

तलाठी पदांसाठी राज्यभरातून तब्बल १० लाख ४१ हजार इच्छूकांनी अर्ज केले आहेत. सर्वाधिक १ लाख १४ हजार अर्ज एकट्या पुणे जिल्ह्यातील (Pune District) असून रायगड जिल्हाही मागे नाही.

Talathi Bharti : गैरप्रकार होण्याची दाट शक्यता! स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केले सतर्क
Talathi Recruitment 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यात महसलू विभागाकडून (Revenue Department) आजपासून (दि. १७ ऑगस्ट) तलाठी पदाच्या (Talathi Recruitment) ४ हजार ६४४ जागांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. तीन टप्प्यांत होणाऱ्या या परीक्षांचा पहिला टप्पा आजपासून सुरू होत आहे. या परीक्षांमध्ये गैरप्रकार होण्याची दाट शक्यता असल्याने परीक्षार्थींनी सतर्क राहावे, असे आवाहन स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केले आहे. (Maharashtra Government)

तलाठी पदांसाठी राज्यभरातून तब्बल १० लाख ४१ हजार इच्छूकांनी अर्ज केले आहेत. सर्वाधिक १ लाख १४ हजार अर्ज एकट्या पुणे जिल्ह्यातील (Pune District) असून रायगड जिल्हाही मागे नाही. रायगडमधून जवळपास १ लाख विद्यार्थ्यांनी तलाठी पदासाठी अर्ज भरला आहे. मागील काही परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघडकीस आले असून पोलिसांकडून अनेकांना अटक करण्यात आली आहे. समन्वय समितीकडून याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

तलाठी भरतीसाठी अर्जांचा पाऊस; तब्बल १० लाख ४१ हजार अर्ज, पुणे जिल्हा आघाडीवर

तलाठी भरतीमध्येही गैरप्रकार होण्याची शक्यता समितीकडून वर्तविण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर समितीने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. समितीने म्हटले आहे की, तलाठी भरतीत गैरप्रकार होण्याची दाट शक्यता आमच्या सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, समन्वयक आणि सदस्यांनी सतर्क रहावे, आपल्या जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी गैरप्रकार घडल्यास मदतीसाठी जाण्याची तयारी ठेवावी. विद्यार्थांनी संपर्क केल्यास योग्य ती मदत मिळवून द्यावी.

समितीची तलाठी भरती प्रक्रियेवर करडी नजर आहेच. पण सर्वसामान्य विद्यार्थांनी परीक्षेदरम्यान सजग राहावे, आपल्या आजू-बाजूला कोणी असा गैरप्रकार करत असल्यास तत्काळ सेंटरमधील अधिकारी आणि पोलिसांना त्वरित सूचित करावे. शक्य असल्यास सर्व घटनेचा व्हिडीओ काढून आम्हाला पाठवावा म्हणजे सर्व विद्यार्थांना वस्तुस्थिती कळू शकेल. गैरप्रकार करणारा एखादा विद्यार्थी पकडल्या गेल्यास त्याच्यावर FIR करेपर्यंत सर्व विद्यार्थांनी सेंटरवरच थांबून पाठपुरावा करावा, अशी विनंती समितीकडून करण्यात आली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo