JEE ॲडव्हान्ससाठी हॉल तिकिट प्रसिद्ध

JEE Advanced हॉल तिकिट उमेदवारांसाठी अधिकृत वेबसाइटवर २६ मे पर्यंत उपलब्ध असेल.

JEE ॲडव्हान्ससाठी हॉल तिकिट प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासने शुक्रवारी सकाळी 10 वाजता संयुक्त प्रवेश परीक्षा JEE ॲडव्हान्ससाठी (JEE Advanced)हॉल तिकिट (Hall Ticket) प्रसिध्द केले आहे.उमेदवार अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in ला भेट देऊन हॉल तिकिट डाउनलोड करू शकतात.

JEE Advanced Exam Admit Card 2024 डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर वापरावा लागेल. JEE Advanced हॉल तिकिट उमेदवारांसाठी अधिकृत वेबसाइटवर २६ मे पर्यंत उपलब्ध असेल. यावर्षी IIT मद्रासतर्फे JEE Advanced 2024 परीक्षा 26 मे रोजी ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर JEE Advanced हॉल तिकीट सोबत आणणे बांधणकारक असेल.

उमेदवारांना पेपर 1 आणि 2 या दोन अनिवार्य पेपरमध्ये उपस्थित राहावे लागेल. JEE Advanced 2024 च्या परीक्षेच्या पॅटर्ननुसार एकूण 54 प्रश्न आहेत, प्रत्येक विषयातील उमेदवारांकडून 18 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक पेपरचा कालावधी तीन तासांचा आहे. दोन्ही पेपरमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित असे तीन विभाग असतील.


 
JEE Advanced 2024: प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे. 

* सर्वप्रथम सर्व उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in ला भेट द्या. 
* होमपेजवरील JEE Advanced 2024 “Admit Card” लिंकवर क्लिक करा.
* लॉगिनसाठी नोंदणी क्रमांक, जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक टाका आणि 'लॉग इन' वर क्लिक करा.
* स्क्रीनवर JEE Advanced Admit Card प्रदर्शित होईल.
* आता प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.