शिक्षणतज्ज्ञ आमनेसामने; 'ते' ३३ शिक्षणतज्ज्ञ राजकीय अजेंडा पुढे रेटत असल्याचा ७१ जणांचा गंभीर आरोप

पाठ्यपुस्तकात केल्या जाणाऱ्या बदलांवरून नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) मधील शिक्षणतज्ञ सध्या  आपापसात भिडले आहेत. 

शिक्षणतज्ज्ञ आमनेसामने; 'ते' ३३ शिक्षणतज्ज्ञ राजकीय अजेंडा पुढे रेटत असल्याचा ७१ जणांचा गंभीर आरोप
NCERT Textbooks issue

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आपला राजकीय (Politics) अजेंडा पुढे नेण्याच्या प्रयत्नात ३३ शिक्षण तज्ज्ञ (Educationist) देशभरातील करोडो मुलांचे भवितव्य धोक्यात घालत आहेत. विद्यार्थी (Students) अद्ययावत पाठ्यपुस्तकांची आतुरतेने वाट पाहत असताना, हे शिक्षणतज्ञ सतत अडथळे निर्माण करत आहेत आणि संपूर्ण प्रक्रियेत अडचणी आणत आहेत, असा गंभीर आरोप केंद्रीय विद्यापीठांच्या (Central Universities) कुलगुरूंसह (Vice Chancellor) ७१ शिक्षणतज्ज्ञांनी एका निवेदनाद्वारे केला आहे. 

पाठ्य पुस्तकात केल्या जाणाऱ्या बदलांवरून नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) मधील शिक्षणतज्ञ सध्या  आपापसात भिडले आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यशास्त्र विषयाच्या  पाठ्यपुस्तक विकास समितीचे सदस्य असलेल्या ३१ शिक्षणतज्ञांनी पुस्तकातून आपली नावे वगळण्याची मागणी केली होती. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. आता त्यांच्याविरोधात ७१ जण आले असून त्यांनी एनसीईआरटीच्या बदलांचे समर्थन केले आहे.

शिक्षण हा देशाच्या अस्तित्वाचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू : अन्नपूर्णा देवी

नावे वगळण्याची मागणी करून हे ३३ शिक्षण तज्ज्ञ आपला राजकीय अजेंडा पुढे नेत आहेत. पाठ्यपुस्तकात सध्याच्या पिढीसाठी सुसंगत असा बदल करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या अंमलबजावणीची प्रक्रिया रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण काही शिक्षण तज्ज्ञ संपूर्ण प्रक्रियेत अडथळे आणत आहेत. चुकीची माहिती, अफवा आणि खोटे आरोप करून, त्यांना NEP च्या अंमलबजावणीत अडथळा आणायचा आहे आणि NCERT पाठ्यपुस्तकांच्या अद्ययावतीकरण व्यत्यय आणायचा आहे, असे आरोप निवेदनात करण्यात आले आहेत.  

"भारतातील शालेय अभ्यासक्रम जवळपास दोन दशकांपासून अद्ययावत करण्यात आलेला नाही. सध्याचा एनसीईआरटी  विद्यार्थ्यांवरील ओझे कमी करण्यासाठी आणि अभ्यासाचे परिणाम सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. अभ्यासक्रमाचे तर्कशुद्धीकरण करून आणि वर्तमान गरजांनुसार अभ्यासक्रमात आवश्यक बदल केला जात आहे," असे निवेदनात म्हटले आहे.

JEE ॲडव्हान्स २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर

निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरू शांतीश्री पंडित, सुरेश कुमार, इंग्रजी आणि विदेशी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू संजय श्रीवास्तव, महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठ, मोतिहारीचे कुलगुरू शंभूनाथ सिंह,  तेजपूर केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी  यांचा समावेश आहे. याशिवाय  केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या सुषमा यादव, इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश मणि त्रिपाठी आणि झारखंडच्या केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू बी दास. यांनीही स्वाक्षरी केली आहे. NEP 2020 ची अंमलबजावणी आणि शालेय अभ्यासक्रमात  अत्यावश्यक सुधारणा करण्याच्या मार्गात अडथळा आणू इच्छिणाऱ्या  गर्विष्ठ आणि स्वार्थी शिक्षणतज्ञांचा पर्दाफाश करण्यासाठी  विचारवंत, शिक्षणतज्ञ आणि संबंधित नागरिकांना या निवेदनावर  स्वाक्षरी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo