AIIMS : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस भरती परीक्षेचा निकाल जाहीर

देशभरातील AIIMS मध्ये लघुलेखक, लिपिक, सहाय्यक अभियंता आणि इतर गट ब आणि गट क पदांच्या एकूण ३ हजार ६० रिक्त जागा भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.

AIIMS : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस भरती परीक्षेचा निकाल जाहीर

ज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (All India Institute of Medical Sciences) सामाईक भरती परीक्षेचा (AIIMS CRE 2023) निकाल जाहीर झाला (Recruitment Exam Result Announced )आहे. परीक्षेस बसलेले उमेदवार aiimsexams.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल तपासू शकतात. तसेच निकाल डाउनलोड करू शकतात. देशभरातील AIIMS मध्ये लघुलेखक, लिपिक, सहाय्यक अभियंता आणि इतर गट ब आणि गट क पदांच्या एकूण ३ हजार ६० रिक्त जागा भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.

हेही वाचा : AIMA : MAT EXAM : मॅनेजमेंट अप्टिट्यूड टेस्ट फेब्रुवारी २०२४ मध्ये ; तारखा झाल्या जाहीर

AIIMS सामायिक भरती परीक्षा १८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते ६ या दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. तर २० डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत परीक्षेचे दुसरे सत्र  घेण्यात आले होते. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कडून निकाल जाहीर करण्यात आला असला तरी तो तात्पुरता आहे. तसेच उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाइन नोंदणी फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे तो घोषित केला आहे.  त्यांना ऑनलाइन स्क्रीनिंग न करता ऑनलाइन (CBT) मोड भरती परीक्षेत बसणे आवश्यक आहे. नोंदणी फॉर्म. तसेच त्यांची उमेदवारी जाहिरातीत नमूद  केलेल्या पात्रता अटी तसेच वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या त्यानंतरच्या शुद्धीपत्र/परिशिष्टांची पूर्तता करण्याच्या अधीन आहे." असे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने प्रसिद्ध केलेल्या निकालाच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. 

असा पहा निकाल 

* aiimsexams.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
* मुख्यपृष्ठावरील CRE निकाल सूचनावर क्लिक करा.
* तुमच्या पोस्ट कोडसाठी निकालाच्या लिंकवर क्लिक करा (पोस्ट कोडसाठी लागू).
* विशिष्ट पोस्ट कोडसाठी AIIMS CRE निकाल 2023 स्क्रीनवर दिसेल.
* निकाल तपासा आणि डाउनलोड करा.