दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; राज्य मंडळाकडून अधिकृत घोषणा

लेखी पुरवणी परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार आहे.

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; राज्य मंडळाकडून अधिकृत घोषणा
SSC, HSC supplementary Examination

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

SSC-HSC Exam Timetable : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (SSC Board) इयत्ता दहावी व बारावीच्या जुलै - ऑगस्ट मध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेचे (Supplementary Exam) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार १८ जुलैपासून परीक्षा सुरू होणार आहेत. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक (Anuradha Oak) यांनी ही माहिती दिली. (SSC-HSC supplementary Exam)

मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, लेखी पुरवणी परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार आहे. इयत्ता बारावीची सर्वसाधारण व द्विलक्षी विषयांची परीक्षा दि. १८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होईल. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक पाहता येणार आहे. 

ITI Admission : ‘आयटीआय’मध्ये दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

इयत्ता बारावीची व्यवसाय अभ्यासक्रमांची परीक्षा दि. १८ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत घेतली जाणार आहे. तर इयत्ता दहावीची परीक्षा दि. १८ जुलै ते १ ऑगस्ट यादरम्यान होणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षाही १८ जुलैपासून सुरू होणार आहेत. या परीक्षा दि. एक ऑगस्टपर्यंत सुरू राहतील.

इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. १८ जुलै ते पाच ऑगस्टदरम्यान होणार आहे. परीक्षेचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे, असे ओक यांनी सांगितले.

शाळेत स्कर्ट घालण्यावर येणार बंदी; मुलींसाठी नवीन ड्रेसकोडची शिफारस, कर्नाटक पुन्हा वादात

परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राहय धरू नये, असे आवाहन ओक यांनी केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo