धक्कादायक : दहावीत ७१ टक्के मिळूनही विद्यार्थिनीची आत्महत्या; एकीने नापास झाली म्हणून संपवले आयुष्य

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासांतच नागपूरमध्ये दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याची घटना घटली आहे. या घटनेने नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून शैक्षणिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.

धक्कादायक : दहावीत ७१ टक्के मिळूनही विद्यार्थिनीची आत्महत्या; एकीने नापास झाली म्हणून संपवले आयुष्य
Chetana Bhoyar commit suicide

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

दहावीचा निकाल (10th Result Update) जाहीर झाल्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये (Andhra pradesh) दहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या (Suicide) केल्याची घटना ताजी आहे. काही जणांना कमी गुण मिळाले म्हणून तर काहींनी नापास झाल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले. आता महाराष्ट्रातही (Maharashtra) अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासांतच नागपूरमध्ये दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याची घटना घटली आहे. या घटनेने नागपूरसह (Nagpur News) संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून शैक्षणिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.

नागपूरातील वाडी भागातील सोनगानगर येथे राहणारी रामदुलारी पंचम झारीया (वय १७) ही दहावीच्या परीक्षेत नापास झाली. निकाल समजल्यापासूनच ती तिणावात होती. शुक्रवारी तिची आई गीता शुक्रवारी कामानिमित्त घराबाहेर होत्या. तर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भाऊ घराबाहेर खेळत होता. हीच वेळ साधत रामदुलारीने पंख्याला साडी बांधून गळफास घेतला.

11th admission: अकरावी प्रवेशाचा दुसरा भाग भरा ८ जूनपासून

काही वेळाने निकालाबाबत विचारपूस करण्यासाठी काही नातेवाईक रामदुलारीच्या घरी आले. मात्र, तिने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. नातेवाइकांनी गळफास काढून तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत रामदुलारीचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

आत्महत्येची दुसरी घटना सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. बहादुरा येथील शशिकांत सोसायटीमध्ये चेतना भोजराज भोयर (वय १६) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला दहावीत ७१ टक्के गुण मिळाले होते. अपेक्षित गुण मिळाले नाहीत, या तणावाखाली ती होती. निकाल समजताच दिने दुपारी घरातील तिच्या खोलीतील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.

11th Admission : अकरावीचे 'कोटा अंतर्गत' दिल्या जाणाऱ्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

काही वेळाने चेतनाचे वडील भोजराज तिच्या खोलीत गेले, त्यावेळी तिने गळफास घेतल्याचे दिसले. वडिलांनी चेतनाला खासगी रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत चेतनाचा मृत्यू झाला होता. चेतनाचे वडील वृत्तपत्र विक्रेते आहे. चेतनाची मोठी बहीण पुण्यात नोकरीला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo