शाळेत स्कर्ट, फ्रॉकवर येणार बंदी; मुलींसाठी नवीन ड्रेसकोडची शिफारस, कर्नाटक पुन्हा वादात  

कर्नाटकातील बहुतेक खाजगी, अनुदानित आणि सरकारी शाळा मुलींसाठी स्कर्ट किंवा फ्रॉक अशा स्वरूपाचा गणवेश निर्धारित करतात. तर केंद्रीय विद्यालय शाळांमध्ये सलवार सूट घालणे अनिवार्य आहे.

शाळेत स्कर्ट, फ्रॉकवर येणार बंदी; मुलींसाठी नवीन ड्रेसकोडची शिफारस, कर्नाटक पुन्हा वादात  
Dress Code for Girls in Karnataka Schools

दीपा पिल्ले पुष्पकांथन

कर्नाटकात (Karnataka) अनेक शाळा सुरु झाल्या आहेत, तर काही ठिकाणी लवकरच शाळा सुरु होणार आहेत. अशा परिस्थिती सुरक्षा आणि विद्यार्थिनींच्या (Girls) सोयीचे कारण सांगत नवीन ड्रेस कोडची (Dress Code) शिफारस करण्यात आली आहे. शाळेत मुलींना स्कर्ट टॉप किंवा फ्रॉक असा गणवेश न देता सलवार किंवा पॅन्ट असा गणवेश असावा, अशी शिफारस कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने (Child Rights protection Commission) शिक्षण विभागाकडे केली आहे. 

कर्नाटक शिक्षण कायदा, १९८३ नुसार, शैक्षणिक संस्थाना त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश ठरवण्याचा अधिकार आहे. कर्नाटकातील बहुतेक खाजगी, अनुदानित आणि सरकारी शाळा मुलींसाठी स्कर्ट किंवा फ्रॉक अशा स्वरूपाचा गणवेश निश्चित करतात. तर केंद्रीय विद्यालय शाळांमध्ये सलवार सूट घालणे अनिवार्य आहे.

ITI Admission : ‘आयटीआय’मध्ये दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

स्कर्ट किंवा फ्रॉक या गणवेशावर आक्षेप घेत कलबुर्गी येथील महिला व बालकल्याण विभागाच्या सहायक संचालकांनी स्कर्ट परिधान करणाऱ्या मुलींच्या गैरसोयीबाबत आयोगाला पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलींचा गणवेश बदलण्याची शिफारस केली होती. या संदर्भात आयोगाने राज्य शिक्षण विभागाला पत्र लिहिले आहे. 

आयोगाने पत्रात म्हटले आहे की, "मुलींना स्कर्ट सारखा गणवेश असला तर त्यांना घरून शाळेत प्रवास करताना, सायकल चालवताना, गर्दीच्या ठिकाणी फिरताना किंवा क्रीडा उपक्रमात सहभागी होताना थोडे गैरसोयीचे किंवा अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे गणवेशात सलवार किंवा पँट असली पाहिजे.’’

धाडसी कामगिरी केलेल्या मुलांचा होणार गौरव; राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी करा अर्ज

यासंदर्भात बंगळुरू येथील 'सेंट अँनीस इंग्लिश मिडीयम स्कुल'च्या मुख्याध्यापिका सिस्टर थिएकल 'एज्युवार्ता' शी बोलताना म्हणाल्या, "आमच्या शाळेत केजी ते चौथी पर्यंत फ्रॉक आणि पुढे ५ वी १० वी पर्यंत स्कर्ट असा गणवेश आहे. स्पोर्ट्सच्या वेळेस मुली ट्रॅक पँट, टीशर्ट आणि जर्सी असा ड्रेस घालतात. इतर वेळेस स्कर्ट किंवा फ्रॉम मध्ये टाईट्स वापरतात. त्यामुळे त्यांना त्या गणवेशात अवघडल्या सारखे वाटण्याची शक्यता खूप कमी आहे. शिवाय बहुतेक शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच पालकांची गणवेश खरेदी झाली असेल. तरीसुद्धा शिक्षण विभागाने गणवेश बदलाचा निर्णय घेतलाच तर त्यांच्या सूचनेनुसार याच वर्षी किंवा पुढच्या वर्षी गणवेशात बदल करता येईल."

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo