राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘आयटीआय’; देवेंद्र फडणवीस यांचे सुतोवाच

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘आयटीआय’; देवेंद्र फडणवीस यांचे सुतोवाच

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

येत्या काळात मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य (Skills) निर्माण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. आपल्याकडे आयटीआय चांगल्या दर्जाचे असले तरी त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे कसे करता येईल, महाराष्ट्रातील आयटीआय (ITI's in Maharashtra) हे आंतरराष्ट्रीय स्कील देणारे, मनुष्यबळ कसे तयार करतील, याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी कौशल्य विभाग प्रयत्न करेल, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केली.

 

नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कौशल्य व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दोन्ही विभागाच्या अधिपत्याखालील सर्व संस्था व कार्यालयात सुरु होणाऱ्या स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन यावेळी पार पडले.

MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मध्ये गैरव्यवहार? चर्चांना उधाण, विद्यार्थी अस्वस्थ

 

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले, कौशल्य प्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून आपल्या आयटीआयमध्ये अत्याधुनिक कोर्सेस चालविले जातात. एकेकाळी उद्योगांना काय हवे, याचा विचार न करता ट्रेड्स तयार केले जायचे. त्यामुळे मुलांना काम मिळत नव्हते. आता उद्योगांचाही यामध्ये सहभाग वाढविला आहे. त्यांना आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्यादृष्टीने अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. आज मोठ्याप्रमाणात प्रशिक्षित मुलांना रोजगाराची संधी मिळत आहे.

 

जो शिकेल त्याला रोजगार मिळेल, अशी व्यवस्था आपल्याला निश्चितपणे तयार करता येईल. शासकीय आयटीआयमध्ये शिकणाऱ्या मुलांची मागणी उद्योगांमध्ये खूप आहे. त्यांच्याकडे प्रशिक्षित लोकं नाहीत. दुसरीकडे युवांना काम हवे आहे. पण उद्योगांना हवे असलेले युवकांकडे नाही, त्यामुळे ते एकत्रित येऊ शकत नाहीत. त्यासाठी कौशल्य प्रशिक्षण विभाग हे काम करत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j