11th Admission : आजपासून विशेष फेरी, या गोष्टीकडे करू नका दुर्लक्ष!

पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये तीन नियमित फेऱ्यांद्वारे ३७ हजार ६२९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.

11th Admission : आजपासून विशेष फेरी, या गोष्टीकडे करू नका दुर्लक्ष!
11th Admission Process

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता अकरावी प्रवेशाची (11th Admission) पहिली विशेष फेरी आजपासून (दि. १७ जूलै) सुरू झाली आहे. मात्र, नियमित फेऱ्यांच्या तुलनेत या फेरीमध्ये शिक्षण विभागाकडून (Education Department) महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. विशेष फेरीमध्ये विद्यार्थ्यांना अर्जाच्या दुसऱ्या भागामध्ये पसंतीक्रम नव्याने द्यावे लागणार आहेत. त्यानंतर हा अर्ज लॉक केल्यानंतरच महाविद्यालय निवडीसाठी तुमचा विचार केला जाणार आहे. अर्ज ऑनलाईन लॉक केला नाही तर तुम्ही प्रवेश फेरीतून बाहेर पडू शकता. (11th Admission Special Round)

पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये तीन नियमित फेऱ्यांद्वारे ३७ हजार ६२९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. तर इन हाऊस कोट्यातून ३ हजार ५९९, अल्पसंख्यांक कोट्यातून २ हजार २५४ आणि व्यवस्थापन कोट्यातून ७२० अशा एकूण ४४ हजार २०२ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे.

शाळेचा प्रताप : विद्यार्थ्याला चौथीत केलं नापास, शाळा सोडल्याच्या दाखल्यावरही उल्लेख

नियमित फेऱ्यांमध्ये आधीच्या फेरीमध्ये भरलेले पर्यायांमध्ये बदल न केल्यास पुढील फेरीसाठी ग्राह्य धरले जात होते. मात्र, विशेष फेरीमध्ये प्रत्येकवेळी पसंतीक्रम नव्याने भरून तो अर्ज लॉक करावा लागणार आहे. अर्ज लॉक केल्याशिवाय प्रवेश प्रक्रियेत त्या अर्जाचा समावेश होणार नाही. त्याचप्रमाणे यापूर्वीच्या फेऱ्यांमध्ये प्रतिबंधित करण्यात आलेले सर्व विद्यार्थी (Students) या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

विशेष फेऱ्यांमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला प्रतिबंधित केले जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. पहिल्या पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्यार्थ्याला प्रतिबंधित केले जाणार नाही. यापूर्वी प्रत्येक फेरीत विद्यार्थ्यांना प्रतिबंधित करून पुढील फेरीसाठी अपात्र ठरवले जात होते.

राज्यात पुण्यासह पिंपरी चिचंवड, मुंबई, नागपूर, नाशिक व नागपूर या महापालिका कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंदीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी : ७६३ पदांसाठी मंगळवारपासून मुलाखती, पात्र उमेदवारांची यादी जाहीर

विशेष फेरीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे

दि. १७ ते २० जुलै – प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, म्हणजे विशेष फेरी एक साठी पसंती अर्ज भाग दोन ऑनलाईन सादर करणे. नवीन विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करून अर्ज भाग एक भरून तो प्रमाणित करून घेऊ शकतात. अर्जाच्या भाग एक मध्ये दुरुस्ती करता येईल. त्यानंतर अर्ज वेळेत लॉक करावा. भाग एक पडताळी झालेले विद्यार्थी भाग दोन भरू शकतात.

दि. २४ जुलै (स. १०) – विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय निवड यादी प्रसिध्द होईल.

दि. २४ ते २७ जुलै - कॉलेज लॉगीनमध्ये प्रवेश ऑनलाईनमध्ये प्रवेश ऑनलाईन निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे प्रवेश नाकारणे या प्रक्रिया सुरू राहतील. प्रवेश घ्यायचा असल्यास लॉगीनमध्ये क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. आणि महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD