CUET-PG परीक्षेसाठी यंदा सर्वाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

यंदा 4 लाख 62 हजाराहून अधिक उमेदवारांनी परीक्षेत भाग घेतला.

CUET-PG परीक्षेसाठी यंदा सर्वाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विविध उच्च शिक्षण संस्थांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग UGC कडून 2022 मध्ये सुरु केलेल्या CUET-PG परीक्षेत यंदा सर्वाधिक विद्यार्थ्यानी सहभाग घेतला असल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष (UGC) एम. जगदीश कुमार यांनी दिली आहे.

जगदीश कुमार म्हणाले, CUET-PG परीक्षा 28 मार्च रोजी घेण्यात आली होती. भारताबाहेरील नऊ शहरांसह 250 हून अधिक शहरांमध्ये ही परीक्षा 15 दिवस घेतली गेली. यंदा 4 लाख 62 हजाराहून अधिक उमेदवारांनी परीक्षेत भाग घेतला. हा आतापर्यंतच्या परीक्षेतील सर्वाधिक सहभाग आहे.विद्यार्थ्यांनी 4 हजार 597 अभ्यासक्रमांसाठी अर्ज केले होते.

CUET (PG)  2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी 4 लाख 62 हजार 725 उमेदवारांनी नोंदणी केली होती.त्यातील  4 लाख 62 हजार 603 ​​उमेदवार परीक्षेस प्रविष्ट झाले. विद्यार्थ्यांच्या सहभागाची ही सर्वात मोठी संख्या आहे. गेल्या वर्षी  म्हणजे 2023 मध्ये CUET-PG मध्ये 4 लाख 59 हजार 83 विद्यार्थी सहभागी झाले होते. भारताबाहेरील नऊ शहरांसह 253 शहरांमध्ये 565 वेगवेगळ्या केंद्रांमध्ये ही परीक्षा ऑनलाइन मोड मोडमध्ये घेण्यात आली होती.