नॅशनल ओपन स्कूलिंग : 10वी, 12 वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना 15 मिनिटांचा वाचनासाठी वेळ

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगकडून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारण्यासाठी परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल लागू करण्यात आले आहेत.

नॅशनल ओपन स्कूलिंग : 10वी, 12 वीच्या परीक्षेत  विद्यार्थ्यांना 15 मिनिटांचा वाचनासाठी वेळ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) कडून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारण्यासाठी (Educational reform) परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल (Change in Examination Pattern) लागू करण्यात आले आहेत. पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना वाचनासाठी अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ (Extra 15 minutes time for reading) दिला जाईल, असे NIOS ने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकामध्ये म्हटले आहे. 

एप्रिल-मे 2024 पासून, विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी 2:15 ते 2:30 पर्यंत अतिरिक्त 15 मिनिटे प्रश्नपत्रिका वाचनासाठी वेळ दिली जाईल. एनआयओएसने सांगितले की वाचनाची वेळ ही विद्यार्थ्यांना या कालावधीत कोणतीही उत्तरे न लिहिता प्रश्नपत्रिकेचे पूर्ण पुनरावलोकन करण्यास सक्षम करण्यासाठी आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात होणारा गोंधळ कमी होईल आणि त्यांना शांत मनाने उत्तरे लिहिता येतील. 

"या तरतुदीमागील उद्दिष्ट NIOS विद्यार्थ्यांना इतर शालेय शिक्षण मंडळांमधील त्यांच्या समकक्षांशी बळकटी देणे, समान शैक्षणिक संधी सुनिश्चित करणे आणि अधिक अनुकूल परीक्षा वातावरण सुलभ करणे हा आहे. NIOS ने विश्वास व्यक्त केला आहे की हा बदल परीक्षेचा ताण कमी करण्यात आणि विद्यार्थ्यांची एकूण कामगिरी वाढविण्यात मदत करेल. ," असे या परिपत्रकामध्ये म्हटले आहे. 

या वेळेचा सदुपयोग करा

NIOS ने सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न सर्वसमावेशकपणे समजून घेण्यासाठी, त्यांच्या उत्तरांचे नियोजन करण्यासाठी आणि आत्मविश्वासाने परीक्षेला जाण्यासाठी हा अतिरिक्त वेळ हुशारीने वापरण्याचा सल्ला दिला आहे. तरतुदीची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याची खात्री करण्यासाठी परीक्षा केंद्रांना याद्वारे निर्देश देण्यात आले आहेत.