पुण्यातील बालगंधर्व चौकात पोलीस भरतीच्या तरुणांचा गृहमंत्री यांच्या विरोधात उद्रेक 

इतर राज्यात वयवाढ होऊ शकते तर महाराष्ट्र हे राज्य भारताच्या बाहेर आहे का? असे एक ना अनेक संतप्त सवाल उपस्थित करत या तरुणांचा अक्षरशः उद्रेक पाहायला मिळाला.

पुण्यातील बालगंधर्व चौकात पोलीस भरतीच्या तरुणांचा गृहमंत्री यांच्या विरोधात उद्रेक 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील पोलीस भरतीची (State Police Recruitment) तयारी करणाऱ्या तरुणांनी (Youth preparing for police recruitment) वय वाढून मिळावे (Demand to be increased in age) या मागणीसाठी पुणे शहरातील बालगंधर्व चौकात  एकत्र येत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांच्या विरोधात उद्रेक केल्याचे पाहायला मिळाले. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान सारख्या इतर राज्यांमध्ये वयवाढ मिळू शकते, एवढेच नाही तर केंद्र सरकाने देखील वयवाढ दिली . सगळ्यात महत्वाचा मुद्दा आम्ही वयवाढ मागत नाही तर केवळ एक संधी मागत आहोत, आणि ती आम्हाला का मिळू नये? याचे कारण त्यांनी आम्हाला द्यावे. इतर राज्यात वयवाढ होऊ शकते तर महाराष्ट्र हे राज्य भारताच्या बाहेर आहे का? असे एक ना अनेक संतप्त सवाल उपस्थित करत या तरुणांनी संताप व्यक्त केला..

मुलगा पोलीस होऊन घरी परत येईल, असे आईचे डोळे अतुरतेने वाट पाहात आहेत, पण जेव्हा आम्ही निराश होऊन घरी जातो आणि आईचे डोळे पाहिले तर अक्षरशः  रडायला येतंय अशी व्यथा पोलीस भरतीचे वय वाढवून मागणाऱ्या एक तरुणाने मांडली आहे. आमचे जे काम करणार आहेत ती फक्त एकच व्यक्ती ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. आमची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे. महत्ताचा मुद्दा हा आहे की, ३१ डिसेंबरच्या आधी भरती झाली असती तर आमच्यावर ही वेळच आली नसती. आमचा गृहमंत्र्यांना सवाल आहे की, तुम्ही का गरीब होतकरु मुलांची थट्टा केली, ती कशासाठी आणि कोणासाठी केली तुम्हाला यामधून काय साध्य करायचे आहे. २८८ आमदार ४८ खासदार सर्वांना  निवदने दिली. मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन केलं, नागपूरला आंदोलन केलं कुठल्याही माध्यमांनी याची दखल घेतली नाही मग आम्ही जायचे कुठे?. सरकार आम्हाला विचारत नाही ना माध्यम आमची दखल घेत नाहीत आम्ही करायचे काय?.  

एक वर्षापासून तयारी करतो, एक दिवस जर ग्राउंडला नाही गेलो तर आईचा प्रश्न येतो बाळा काय झाले. जी आई आस लावून बसली आहे माझा मुलगा एक दिवस वर्दी घालून येईल. काय उत्तर देव, माझ्या त्या आईला हे मला फडणवीस साहेबांनी सांगावे. अक्षरशः आता मुलं वेगळ्या भूमिकेत येण्यासाठी तयार झाले आहेत. जर  वय वाढ मिळाली नाही तर मुलं  आत्महत्यासारखे कठीण पाऊल उचलू शकतात आणि याला फक्त हे शासन जबाबदार असणार आहे. 

गृहमंत्री  फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशन काळात भर सभागृहात पोलीस भरतीच्या तरुणांना आश्वासित केले होते की, एकही मुलागा वंचित राहाणार नाही.मग कुठे गेलं त्यांचे ते आश्वासन आणि त्याचे काय झाले हे सांगितलं पाहिजे. ते आता आपला शब्द मागे का घेत आहेत हेच समजत नाही. शासनाकडून आम्हाला बघतो, करतो,  ही आश्वासने दिली जात आहेत. आमची एकच मागणी आहे की आम्हाला एक संधी मिळावी.