MPSC EXAM : त्या शासकीय कर्मचाऱ्यांची शिफारस केली रद्द ; परीक्षेपासून कायम स्वरूपी रोखले 

MPSC EXAM : त्या शासकीय कर्मचाऱ्यांची  शिफारस केली रद्द ; परीक्षेपासून कायम स्वरूपी रोखले 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 MPSC Scam : राज्यभर गाजलेल्या डमी परीक्षार्थी प्रकणात सापडलेल्या कुणाला विनोद राठोड ( Kunal Vishal Rathod ) याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (Maharashtra Public Service Commission) परीक्षा देण्यापासून कायमस्वरूपी मज्जाव करण्यात आला असून लिपिक टंकलेखक (Clerk Typist) या पदावर केलेली त्यांची शिफारस रद्द केली आहे.कुणाल यांची मुंबई येथे मत्स्य व्यवसाय कार्यालयात लिपिक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.सध्या त्याला शासकीय सेवेतून बडतर्फे करण्यात आले होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे.त्याचा प्रमाणे आयोगाच्या परीक्षा किंवा कार्यपध्दतीवर समाजमाध्यमावर व्यक्त होणाऱ्या विद्यार्थ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जात आहे.मात्र, कुणाल याने गैरमार्गाने नोकरी मिळवली असल्याचे आढळून आले होते.सामान्य प्रशासन विभागाने अध्यादेश काढून कुणाल विनोद राठोड यांची शिफारस रद्द केली जात असल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा : सेट परीक्षेची तारीख ठरली ; ७ एप्रिलला होणार परीक्षा

शासन आदेशानुसार आयोगातर्फे घेण्यात आलेल्या २०११ च्या परीक्षेद्वारे कुणालची लिपिक- टंकलेख गट क मधील पदावर नियुक्ती केली होती.परंतु, त्याने प्रबोध माधुकर राठोड आणि सोमनाथ पारवे-पाटील यांच्या मदतीने परीक्षेत गैरप्रकार करून शासकीय नोकरी मिळवली असल्याचे समोर आले होते.या प्रकरणी पोलीस तपास करण्यात आला होता.तसेच डमी परीक्षार्थी प्रकणातील आरोपींना अटक करून न्यायालयात हजार करण्यात आले होते.त्यानंतर संबंधितांना निलंबित करण्यात आले होते.आता  कुणाल राठोड याला सर्व परीक्षा व निवडी करिता कायमस्वरुपी मज्जाव केला आहे.तसेच त्यांच्या सेवा समाप्तीची कार्यवाही तात्काळ करावी,असे ३० नोव्हेंबर रोजी काढलेल्या आध्यादेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.