पोलीस आणि SRPF भरतीच्या तारखा बदला ; खा. नीलेश लंके यांची मागणी

पोलीस भरती आणि SRPF भरतीच्या मैदानी परीक्षेच्या तारखा या एकाच दिवशी किंवा सलग एका पाठोपाठ लागून आल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत.

पोलीस आणि SRPF भरतीच्या तारखा बदला ; खा. नीलेश लंके यांची मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यात १९ जून पासून सर्वत्र सुरू होत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस चालक, जेल पोलीस (Police Recruitment Ground Test) आणि SRPF भरतीतील मैदानी परीक्षेच्या (SRPF Recruitment Ground Test) तारखा या एकाच दिवशी (Same Date) किंवा सलग एका पाठोपाठ लागून आल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत. त्यात पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना सलग एका पाठोपाठ ग्राउंड आल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ग्राउंडला जाण्यासाठी शक्य होणार नाही. तरी सरकारने वर्षानुवर्ष मेहनत घेणाऱ्या उमेदवारांच्या भविष्याचा विचार करून पोलीस भरती व SRPF भरतीच्या तारखा बदलाव्यात (Police Recruitment and SRPF Recruitment Dates Change), अशी मागणी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (MP Nilesh Lanke) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनांद्वारे केली आहे. 

भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडे त्यांची महत्त्वाची मूळ कागदपत्र असल्यामुळे ती पावसात भिजली  तर त्यांना भरतीसाठी उतरता येणार नाही. भरतीसाठी आलेले विद्यार्थी शकडो किलोमीटरवरून भरतीसाठी आलेले असतात. त्यांची ना जेवणाची सोय असते ना राहण्याची सोय असते. पाऊस नसेल तर मूल कुठेतरी ब्रीज खाली, रोडवर ग्राउंड वर झोपतात आणि जर पाऊस असेल तर ती मुल कुठ झोपतील ? मुलांचे किती हाल होतील ? यांचा विचार प्रशासनाने करावा.

वर्षानुवर्षे भरतीची तयारी करायची पण ऐन भरतीच्या वेळेसच सरकारकडून अशाप्रकारचा सावळा गोंधळ निर्माण केल्याने विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागतोय, तरी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता पोलीस भरती व SRPF भरतीच्या तारखा बदलाव्यात, अशा मागणीचे निवेदन निलेश लंके यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना दिले आहे.