चिमुकले रमले ‘बालवाटिके’त; फुलांच्या वर्षात उत्साहात स्वागत

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार ५-३-३-४ असा शैक्षणिक आराखडा  ठरवण्यात आला आहे. त्यानुसार आता केंद्रीय विद्यालयांमध्ये ५ वर्षांपुढील विद्यार्थ्यांसाठी बाल वर्ग सुरु करण्यात आले आहेत.

चिमुकले रमले ‘बालवाटिके’त; फुलांच्या वर्षात उत्साहात स्वागत
BalVatika

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील केंद्रीय विद्यालय (Kendriya Vidyalaya) वायुसेना क्रमांक दोन या शाळेत सोमवारी अतिशय उत्साही वातावरण होते. शाळेत आपापल्या पालकांसोबत आलेल्या चिमुकल्यांचे फुलांचा वर्षाव करून त्यांना टिळा लावून त्यांचे स्वागत करण्यात आले. खास छोट्या विद्यार्थ्यांसाठी (Students) शाळेत लेझीमचा कार्यक्रम ठेण्यात आला होता. औचित्य होते, नवीन शैक्षिक धोरणांतर्गत केंद्रीय विद्यालयांमध्ये बालवाटिका (Balvatika) म्हणजे बाल वर्ग सुरु करण्याचे. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार ५-३-३-४ असा शैक्षणिक आराखडा  ठरवण्यात आला आहे. त्यानुसार आता केंद्रीय विद्यालयांमध्ये ५ वर्षांपुढील विद्यार्थ्यांसाठी बाल वर्ग सुरु करण्यात आले आहेत. शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी म्हणून सुरुवातीच्या शैक्षणिक आराखड्यातील बालवाटिका-३ याची सुरुवात केंद्रीय विद्यालय क्र.२ मध्ये झाली. सोमवारी प्रवेशोत्सवदरम्यान मुलांसोबत त्यांचे पालक सुद्धा शाळेमध्ये उपस्थित होते. 

गुरुजीच घाबरले परीक्षेला; गुणवत्ता तपासण्याच्या परीक्षेला ९९ टक्क्यांपेक्षा अधिक शिक्षकांची दांडी

स्वागतानंतर विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मुलांचे नवीन वर्ग दाखवण्यात आले. जे अतिशय आधुनिक व शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करणारी शिक्षण पद्धतीवर आधारित होते. यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी वेगवेगळ्या शैक्षणिक पद्धतीवर बनविलेल्या शैक्षणिक साहित्याची पाहणी केली. यानंतर खास छोट्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्याचे कार्यक्रम सादर केले. 

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक  संजय कुमार पाटील यांनी पालकांना बालवाटिका ही संकल्पना, ती स्थापन करण्यामागची उद्दिष्टे  समजावून  सांगितली. विद्यालयाच्या प्राचार्या शायनी जॉर्ज आणि  विद्यालयाचे उपप्राचार्य प्रवीण यादव यांनी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक केले.  उत्सवादरम्यान विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये उत्साह आणि  कुतहल दिसून आले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD