विद्यार्थ्यांनी देशाबाहेर घालवलेली काही वर्षे ही आयुष्याची महत्वपूर्ण गुंतवणूक!

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्रातर्फे "आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन" सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांनी देशाबाहेर घालवलेली काही वर्षे  ही आयुष्याची महत्वपूर्ण गुंतवणूक!
Symbiosis University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

जेव्हा विद्यार्थी (Students) शिक्षणासाठी (Education) किंवा इतर कोणत्याही कारणासाठी आपल्या देशाबाहेर काही वर्षे घालवतात तेव्हा ती त्यांच्या आयुष्याची एक महत्वपूर्ण अशी गुंतवणूक बनते. या काळात त्यांना जो आनंद, अनुभवण्यास मिळतो व त्याचप्रमाणे ज्याकाही समस्यांना सामोरे जावे लागते त्यासर्वच गोष्टी पुढील आयुष्यात विलक्षण आठवणी बनून राहतात, असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे (Dr. Mohan Agashe) यांनी व्यक्त केले.

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्रातर्फे "आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन" सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. मोहन आगाशे यांच्यासह रिबल्बिक ऑफ द गॅम्बियाचे भारतातील उच्चायुक्त  एच. ई. मुस्तफा जवारा, खासदार डॉ. श्रीनिवास पाटील, सिंबायोसिसचे अध्यक्ष व विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार उपस्थित होते.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘आयआयटी’मध्ये शिकण्याची संधी

यावेळी बोलताना डॉ. आगाशे म्हणाले,  जर आपली इच्छा प्रबळ असेल तर एखाद्या विचाराचे वास्तवात रूपांतर करण्याची क्षमता तिच्यात असते आणि तरीही आपली इच्छा कायम राहते. जीवनात काहीतरी साध्य करण्याची प्रबळ इच्छा नक्कीच फलद्रुप होऊ शकते, असे असे मार्गदर्शनही आगाशे यांनी विद्यार्थ्यांना केले.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी नवीन संस्कृती, विविध पार्श्वभूमीचे लोक, नवीन मित्र यांच्याशी जुळवून घेणे हे एक आव्हान असते. परंतु त्यामुळे तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक होतो. इथे येणारे अनुभवच तुम्हाला तुमच्या शिक्षणानंतर विद्यापीठाबाहेरील आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम बनवतात, असे एच. ई. मुस्तफा जवारा यांनी सांगितले.

डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाचे शहरातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्व असल्याचे नमूद केले. परदेशी विद्यार्थी आंतरराष्ट्रीयीकरणाचे प्रतीक आहेत. परदेशी विद्यार्थी भारताचे सदिच्छा दूत आहेत. वसुधैव कुटुंबकम हे संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे मार्गदर्शक तत्त्व आहे, असेही डॉ. मुजुमदार पुढे बोलताना म्हणाले. विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर यांनी प्रास्ताविक केले व कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते यांनी आभार प्रदर्शन केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD