गुरुजीच घाबरले परीक्षेला; गुणवत्ता तपासण्याच्या परीक्षेला ९९ टक्क्यांपेक्षा अधिक शिक्षकांची दांडी

केंद्रेकर यांनी शिक्षकांची गुणवत्ता तपासण्यासाठी पहिली ते १२ वी पर्यंतच्या शिक्षकांची 'शिक्षक प्रेरणा परीक्षा' घेण्याचे ठरवले होते.

गुरुजीच घाबरले परीक्षेला; गुणवत्ता तपासण्याच्या परीक्षेला ९९ टक्क्यांपेक्षा अधिक शिक्षकांची दांडी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यार्थ्यांचे (Students) भविष्य घडवणाऱ्या काही शिक्षकांचे (Teachers) सामान्य ज्ञान किती सामान्य असते, याचे काही व्हिडिओ, बातम्या, सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. पण आता मराठवाड्यात (Marathwada) शिक्षकांचीच गुणवत्ता तपासण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. मराठवाड्यातील शिक्षकांसाठी काल आणि आज म्हणजेच ३० आणि ३१ जुलै रोजी 'शिक्षक प्रेरणा परीक्षा' आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या परीक्षेला मराठवाड्यातील ८७ हजार शिक्षकांपैकी फक्त २ हजार ८४३ शिक्षक उपस्थित राहिले. त्यामुळे संपूर्ण राज्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. (Teachers Examination)

तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काही महिन्यांपूर्वी मराठवाड्यातील शाळांची पाहणी केली होती. त्यानंतर केंद्रेकर यांनी शिक्षकांची गुणवत्ता तपासण्यासाठी पहिली ते १२ वी पर्यंतच्या शिक्षकांची 'शिक्षक प्रेरणा परीक्षा' घेण्याचे ठरवले होते. मात्र, या परीक्षेला अनेक शिक्षक संघटनांचा पहिल्यापासूनच विरोध होता. विशेष म्हणजे मराठवाड्यात २३ हजार शिक्षकांनी परीक्षेसाठी नावनोंदणी केली होती. पण  प्रत्यक्षात मात्र काल ३० जुलै ला झालेल्या परीक्षेत परीक्षा केंद्रावर फक्त २ हजार ८४३ शिक्षक उपस्थित होते.

RTE Admission : शुल्क प्रतिपूर्तीसाठी स्वंयअर्थसहाय्यित शाळा संघटनेचे सरकारला साकडे

काल ३० जुलै रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत भौतिकशास्त्र, ११.३० ते १२.३० या वेळेत रसायनशास्त्र, १ ते २ या वेळेत जीवशास्त्र या विषयांचे पेपर होते. तर आज सकाळी १० ते ११ या वेळेत गणित ११.३० ते १२.३० या वेळेत इंग्रजी आणि दुपारी १ ते २ या वेळेत इतिहास व भूगोल (एकत्रित) विषयांची परीक्षा झाली. चुकीच्या प्रत्येक उत्तरासाठी ०.२५ गुण वजा करण्यात येणार आहेत.

दरम्यान, केंद्रेकर यांनी महिनाभरापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. परंतु केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशीच शिक्षकांच्या परीक्षांचे वेळापत्रक आणि त्याबाबतचा कार्यक्रम निश्चित करणारा आदेश जारी केला होता. त्यानुसार आता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातुन ही परीक्षा घेण्यात आली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD