शिक्षकांना निवडणूकांची कामे देऊ नका ; मुख्याध्यापक संघाची मागणी

पुणे जिह्यातील शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांबाबत मुंबई शहर व मुंबई उपनगर मधील कर्मचाऱ्यांप्रमाणे योग्य निर्णय घ्यावा: नंदकुमार सागर

शिक्षकांना निवडणूकांची कामे  देऊ नका ; मुख्याध्यापक संघाची मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सरसकट शिक्षकांना निवडणूक (State Election Commission) कर्तव्यार्थ तसेच मतदार यादीच्या (Election Duty) कामासाठी कायमस्वरुपी काम देणे हे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारे ठरत आहे. त्यामुळे पुणे जिह्यातील शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांबाबत मुंबई शहर व मुंबई उपनगर मधील कर्मचाऱ्यांप्रमाणे योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्यध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर (Nandkumar Sagar) यांनी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Divase) यांच्याकडे केली आहे. 

लोकसभा निवडणुक २०२४ च्या कामाकरीत तसेच मतदार याद्यांच्या अद्यावती करणासाठी शालेय कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी फेब्रुवारी ते एप्रिल हा कालावधी शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. या कालावधीत ५ वी, ९ वी, ११ वी तसेच १० वी-१२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा आहेत. या कालावधीत अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा, पेपर तपासणी इत्यादी शैक्षणिक कामे करावी लागतात. शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये; यासाठी योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याध्यापक संघाने केली आहे. 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आणि दहावी- बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबई शहर व उपनगर परिसरातील शाळांमधील शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून सूट देण्यात आली आहे. मात्र, आता या मागणील राज्यातील सर्वच जिल्ह्यातून जोर धरला जात आहे. काही दिवसांपुर्वी केवळ मुंबईतील नाही तर राज्यातीलअ सर्वच शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून मुक्त करा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे  (MLA Satyajit Tambe) यांनी राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली होती.